नाशिक : राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळून शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर या सरकारमधील मंत्रीमंडळातील अनेक मंत्री अडचणीत सापडले. यातच दोन दिवसापुर्वीच कृषीमंत्री अब्दुल सत्तारांर गंभीर आरोप करण्यात आले. यातच आता शिंदे सरकारमधील बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादा भुसे अडचणीत सापडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक व्हिडीओ ट्विट करत निशाणा साधला आहे.
“आदित्य ठाकरे सोन्यासारखा मूलगा, त्यांना बदनाम करणाचे विरोधकांचे प्रयत्न”
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलेल्या व्हि़डीओमध्ये दादा भुसे तरूणांना जबरदस्त मारहाण करतांना दिसत आहेत. तसेच त्याला अश्लिल शब्दात शिव्या देखील देतांना दिसत आहे. त्यामुळे आता दादा भुसे यांच्यावर कारवाई केली जाणार का ? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. त्यामुळे शिंदे फडणवीस सरकारमधील आणखी एक मंत्री आता अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
“नारायण राणेंचं कर्तृत्व शुन्य, त्यांना कवडीचीही किमंत कुणी देत नाही”
आव्हाडांनी आपल्या ट्विटमध्ये असं म्हटलं आहे की, मंत्री दादा भुसे फटकावतात. शिव्या देतात, मुख्यमंत्री साहेब कुठला गुन्हा पोलीस घेणार. पोलिसांसमोर मारले. माझा नग्न फोटो फेसबुकवर टाकणाऱ्याला आपण मांडीवर बसवलात. सीबीआय चौकाशी लागावी म्हणून वकिलांची फौज उभी केलीत. सर्वोच्च न्यायालयात मध्ये रात्री त्या विकृत बरोबर आपली बैठक घेतली. असं म्हणत आता बोला. असं आव्हाडांनी ठणकावून सांगितलं आहे.
बाळासाहेब थोरातांना भोवळ, हाताला, खांद्याला दुखापत, मुंबईत आणणार..
तसेच पुढे त्यांनी असं म्हटलं आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माझ्यासाठी वकिलांची फौज पोलिसांची खोटी प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात द्यायला लावलीत. मी सराईत गुन्हेगार आहे, असे पोलीस सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञा पत्र देतात. वाह..साहेब आपण मला फाशी देऊ शकत नाही. किंवा मुडदा ही पाडू शकत नाही. माझ्याविरूद्ध जिने 354 दाखल केला. जिने रात्री आपली भेट घेतली. तीच्या विरूद्ध जबरदस्ती करून छोट्या पोरींना शरीर विक्री करण्याचा गुन्हा नोंद झाला आहे. आपण माझे आयुष्य उद्धवस्त करण्यासाठी कारस्थान रचलात. आपण मित्र होतो. विसरलात. असंही आव्हाडांनी म्हटलं आहे.
मंत्री दादा भूसे फटकावतात .
शिव्या देतात
मुख्यमंत्री साहेब
कुठला गुन्हा पोलिस घेणार
पोलिसां समोर मारले
माझा नग्न फोटो fb वर टाकणाऱ्याला आपण मांडीवर बसवलत #सीबीआय चौकशी लागावी म्हणून वकिलांची फौझ उभी केलीत supreme court मध्ये
रात्री त्या विकृत बरोबर आपली बैठक
आता बोला .. pic.twitter.com/EGsJmvApfI— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 26, 2022
Read also
- “तसं सत्ताधाऱ्यांचं झालंय”, अन् रोहित पवारांनी तो व्हिडिओ ट्विट करत साधला निशाणा
- “तर कृषीमंत्र्याला सभागृहात बसण्याचा अधिकार नाही, फौजदारी गुन्हा दाखल करा”
- सोमय्यांकडून शरद पवारांचं कौतुक, म्हणाले, “मी त्यांच्याकडून एक गुण घेतलाय, तुम्हीही घ्या”
- “खंड न पडता खाता श्रीखंड, सांगा एकनाथराव…यासाठीच केला होता का बंड”; राष्ट्रवादीने डिवचलं
- “भाजपचं शिंदे गटाला संपवण्याचा प्रयत्न,एकनाथ भाऊंना कधी समजणार?” सुषमा अंधारे