मुंबई: मालाडच्या कुरारमध्ये मेट्रोच्या कामसााठी सकाळी सकाळीच तोडक कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक संतापले असून त्यांनी या कारवाईला विरोध सुरू केला आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनीही या कारवाईला विरोध केल्याने भातखळकर यांना वनराई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.
हे पण वाचा: पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी संजय राठोड यांना क्लीन चिट? गृहमंत्र्यांचे महत्वपूर्ण विधान
मालाड कुरार येथे एमएमआरडीएकडून कुरार मेट्रो स्टेशनच्या कामासाठी काही झोपड्यांवर कारवाई करण्यात येत आहे. रात्री १२ वाजता या झोपडपट्टीवासियांना नोटिसा दिल्यानंतर आज सकाळीच पोलिसांच्या लवाजम्यासह ही तोडक कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी रस्त्यावर उतरून या तोडक कारवाईला विरोध केला आहे. त्यामुळे परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. या कारवाईची माहिती मिळताच आमदार अतुल भातखळकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन कारवाईला विरोध केला. त्यामुळे अतुल भातखळकर यांच्यासह भाजप कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
हे पण वाचा: “प्रविण तू तर चॅम्पियन आहेसच तुझे आई-वडिलही चॅम्पियन आहेत”, नरेंद्र मोदींकडून कौतुक
आमचं आंदोलन सुरूच राहील
एमएमआरडीएच्या प्रकल्पासाठी कोणतीही नोटीस न देता घरं तोडण्यात येत आहेत. त्याला आम्ही विरोध केला होता. काल रात्री १२ वाजता नोटिसा देऊन आज सकाळी ९च्या आधीच प्रचंड पोलीस बंदोबस्त लावून झोपड्यांवर कारवाई करण्यात आली. भर पावसात कारवाई सुरू करण्यात आली. लोकांना मारहाण करत घराच्याबाहेर काढलं. आम्ही त्याला विरोध केला. त्यामुळे आम्हाला ताब्यात घेतलं. पोलिसी दंडुका दाखवत एकाला एका, तर दुसऱ्याला दुसऱ्या ठिकाणी ताब्यात घेऊन मोगलाई पद्धतीने आमच्यावर कारवाई करण्यात आली. पण आमचा लढा सुरू राहील. हे बांधकाम आम्ही होऊ देणार नाही. आम्हाला योग्य घरं मिळाली पाहिजे. झोपडपट्टीवासियांचं पुनर्वसन झालंच पाहिजे, असं भातखळकर यांनी सांगितलं.
हे पण वाचा: राज ठाकरे आणि चंद्रकांतदादा एकमेकांना भेटण्याची शक्यता; मनसे आणि भाजपा एकत्र येण्याच्या चर्चेला उधाण
कोर्टात धाव घेणार
आम्ही आंदोलन करणारच. हायकोर्टाने कोविड काळात घरे तोडण्यास मनाई केली आहे. असं असतानाही पोलिसांनी बेकायदेशीरपणे बळजबरी करून तोडक कारवाई केली. याच्याविरोधात आम्ही सोमवारी पोलीस आणि इतरांविरोधात कोर्टाचा अवमान केल्याची याचिका दाखल करू, असं त्यांनी सांगितलं.