तसेच आजकाल महागडा स्मार्टफोन हातात दिसावा यासाठी अनेक जन लाखो रुपये मोजतात. आता मोबाईल क्षेत्रातील आघाडीची कंपनी ॲपलने एक सोन्याने मढवलेला फोन तयार केला आहे. हा ॲपलचा लेटेस्ट iPhone 12 प्रो काही महिन्यांनंतर लाँच होणार आहे.
ॲपलचा हा सोनेरी फोन खरेदी करण्यासाठी मात्र मजबूत किंमत मोजावी लागणार आहे. विशेष म्हणजे हा आयफोन १२ प्रो साठी तब्बल १७ लाखांहून अधिक किंमत मोजण्याची तयारी अनेकांनी दाखवली आहे. लग्झरी फोन बनवणारी कंपनी ब्रँड Caviar कडून याचा फोटो शेयर करण्यात आला आहे.
ही आहेत फोनची वैशिष्ट्य :-
१) iPhone 12 Pro ला १८ कॅरेटच्या सोन्याने मढवले आहे.
२) बॅक पॅनेलला जबरदस्त पॅटर्न आहे.
३) नाव iPhone 12 Pro Victory Pure Gold असून फोनवर फ्लोरल डिझाईन शिवाय ०.४८ कॅरेटचे हीरे लावण्यात आले आहेत.
४) गोल्ड फिनिश आणि लेदरची जबरदस्त पॅकेजिंग मध्ये येणाऱ्या या फोनमध्ये सोन्याशिवाय कार्बन आणि टायटेनियम व्हर्जन मध्ये सुद्धा खरेदी केले जावू शकते.