मुंबई : राज्याच्या हंगामी विधानसभा अध्यक्षपदी भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. आज कालिदास कोळंबकर विधानसभेचे हंगामी अध्यक्षपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. विधानसभेच्या विशेष अधिवेशनासाठी आज राजभवनामध्ये राज्याचे राज्यपाल. सी.पी. राधाकृष्णन ते शपथ घेणार आहेत.
हेही वाचा…एकीकडे शपथविधी तर दुसरीकडे राज्यभर EVM विरोधात आंदोलन…?
सात ते आठ डिसेंबरला राज्य सरकारचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यासाठी विशेष अधिवेशनामध्ये नवनिर्वाचित आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यासाठी हंगामी अध्यक्षांची निवड केली जाते. आज हंगामी अध्यक्षांना शपथ दिली जाईल. सात, आठ आणि नऊ डिसेंबर या तीन दिवसांच्या विशेष अधिवेशन दरम्यान कोळंबकर हंगामी अध्यक्ष म्हणून काम पाहतील.
हेही वाचा…राहुल नार्वेकर सुध्दा पुन्हा येणार…? कोण होणार नवे विधानसभा अध्यक्ष ?
दरम्यान, माझा पक्षाकडून आज मला हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ घेण्यास सांगितले आहे. त्यानुसार मी शपथ आज दुपारी घेणार आहे. पुढे विधानसभा अध्यक्ष म्हणून कायम ठेवण्याबाबत पक्ष निर्णय घेईल. मात्र मी माझी इच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बोलून दाखवली आहे. अशी प्रतिक्रिया काळीदास कोळंबकर यांनी दिली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“मुख्यमंत्री बदलतो, पण अजित पवार झालेहेत पर्मनंट उपमुख्यमंत्री”, नवा रेकॉर्ड अलर्ड मोडवर..
हेही वाचा…उपमुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे राजी, ? पण गृहमंत्रीपदाबाबतचा पेच कायम, काय घडतंय?
हेही वाचा…मोठी बातमी…! बावनकुळेंसह, पडळकर, आमश्या पाडवींचं विधान परिषदेचं सदस्यत्व रद्द, कारण काय ?