पुणे: राज्य सरकारने गठित केलेल्या पुणे महानगर नियोजन समितीवर मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष निमंत्रित सदस्य म्हणून खासदार बारणे यांची नियुक्ती केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या समितीचे अध्यक्ष आहेत. आगामी पाच वर्षांसाठी समितीचे गठन करण्यात आले असून राज्याच्या नगरविकास विभागाने याबाबतची अधिसूचना जारी केली आहे.
हे पण वाचा: नामनियुक्त सदस्यांची नेमणूक करणे, राज्यपालांचे घटनात्मक कर्तव्य -उच्च न्यायालय
पुणे महानगर नियोजन समितीच्या आगामी पाच वर्षांसाठी गठण करण्यात आले असून, या समितीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अध्यक्ष आहेत कोरोना महामारीमुळे लागू असलेले निर्बंध लक्षात घेता थेट निवडणुकीद्वारे निवड निवडून देण्याच्या तीस सदस्यांच्या निवडणूक विलंब लागत असल्याने शासनाने नामनिर्देशित आणि खासदार आमदार यांच्यामधून वरून नियुक्त करण्याच्या सदस्याची नियुक्ती केली आहे.
हे पण वाचा: या मंत्र्यांना डच्चू, तर या मंत्र्यांना मिळू शकते संधी; लवकरच राज्य मंत्रिमंडळातही फेरबदलाचे संकेत
पुणे महानगर क्षेत्र म्हणून २१ ऑगस्ट २०१८ रोजी घोषित करण्यात आले. शासनाने नामनिर्देशित सदस्यांची घोषणा करून पुणे महानगर नियोजन समिती गठीत केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील पुणे महानगर नियोजन समितीमध्ये संसद आणि विधिमंडळ सदस्यांमधून शिवसेना नेते, राज्यसभा खासदार संजय राऊत, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे तसेच भूम-परांड्याचे आमदार तानाजी सावंत आणि भोरचे आमदार संग्राम थोपटे यांना विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. विधानसभा सदस्यांमधून मावळचे आमदार सुनील शेळके आणि पुरंदरचे आमदार संजय जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हे पण वाचा: ‘सामाना’तल्या फटकेबाजीवरून संजय राऊत-नाना पटोलेंमध्ये तुंबळ वाक्युद्ध
विधानसभा सदस्य मधून मावळचे आमदार सुनिल शेळके आणि पुरंदरचे आमदार संजय जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय शासन निर्णय पदसिद्ध सदस्यांमध्ये नगर विकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव, पुण्याचे विभागीय आयुक्त स्थानिक स्वराज्य संस्थेचे कार्यकारी अधिकारी म्हणून पुणे पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त पिंपरी चिंचवड नगर विकास प्राधिकरणाचे मुख्य अधिकारी, आळंदी, तळेगाव, दाभाडे आणि लोणावळा येथील नगरपरिषदांचे मुख्य अधिकारी तसेच अनुभवी तज्ञ सदस्य म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता कृष्णा खोरे महामंडळाचे कार्यकारी संचालक मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष यांचा यामध्ये समावेश आहे.
हे पण वाचा: मोठी बातमी! अखेर “या” कारणासाठी महाविकास आघाडीतून बाहेर पडणार काँग्रेस
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, ”पुणे महानगर नियोजन समितीवर काम करण्याची संधी दिल्याबाबत मी पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानतो. समितीच्या माध्यमातून पुणे जिल्ह्याच्या विकासाचे नियोजन करता येईल. प्रारुप आराखडा केला जाईल. मावळ, पिंपरी-चिंचवड शहरातील विकासकामांसाठी प्राधान्य देणार आहे. शहराचा समतोल, सर्वंकश विकास करण्यासाठी प्रयत्न करणार आहे”.
Read Also :
-
“हुकूमशाही सरकारकडून संविधानाचा अवमान”, राष्ट्रवादीचा हल्लाबोल; दिली आंदोलनाची हाक
- मोदींच्या काळात फोन टॅप झाले नाही, मनमोहन सिंगांच्या काळात झाले – फडणवीसांचा दावा
- धक्कादायक! मोदी सरकारचा देशाच्या सुरक्षेशी खेळ? विरोधकांनी केला हेरगिरीचा भांडाफोड
- “काँग्रेसनेही कायम केला आहे यंत्रणाचा यथेच्छ गैरवापर”, भाजपने आकडेवारी देत केला गंभीर आरोप
- का होतोय केंद्रावर नागरिकांची हेरगिरीचा केल्याचा आरोप? काय आहे नेमकं ‘पेगासेस’ प्रकरण; वाचा थोडक्यात