वृद्ध कलावंत आणि साहित्यिकांना दोन महिन्याचे मानधन एकत्रित देणार असल्याची घोषणा राज्याचे सांस्कतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.
राज्यातील सुमारे २८ हजार वृद्ध कलावंत आणि साहित्यिकांना सांस्कृतिक कार्य विभागातर्फे दरमहा अदा करण्यात येणाऱ्या मानधनापैकी मार्च व एप्रिल महिन्यांचे मानधन एकत्रितपणे अदा करण्यात येत असून येत्या आठवड्याभरात ते संबंधितांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती देशमुखांनी दिली. कोविड -१९ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर, उर्वरित मानधनसुद्धा लवकरात लवकर एकत्रितपणे अदा करण्याची विनंती वित्त विभागाला करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.तसेच राज्याचा सांस्कृतिक कार्य विभाग कलाकारांच्या अडचणी जाणून त्यांच्या पाठीशी यापुढेही समर्थपणे उभा राहील आहे, असेही सांस्कृतिक कार्य मंत्र्यांनी कलावंत आणि साहीत्यिकांना आश्वस्त केले आहे.
राज्यातील वृद्ध कलावंत व साहित्यिकांना १९५५ – ५६ पासून अ, ब व क या वर्गीकरणानुसार मासिक मानधन दिले जाते. मात्र कोरोनामुळे ते दोन महिने विलंब झल्याने दरमहिना मिळणारे मानधन वेळेत देण्यात येणारे मानधन मिळावे ही मागणी गेले काही दिवसांपासून होत होती. अखेर राज्याचे सांस्कतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख मार्च आणि एप्रिलमहिन्याचे मानधन एकत्र देण्याचा निर्णय घेतला आहे.