प्रतिनिधी / ओंकार गोरे
मुंबई : दिवसाला कोट्यावधींची आर्थिक उलाढाल करणारे शहर, रक्ताची खेळी करणारे गुंड आणि त्यामुळे पोलिसांचा होणारा थरकाप म्हणून ओळखली जाणारी एकेकाळची मायानगरी म्हणजे मुंबई. मुंबईच्या डॉनच्या बाबतीत दोनच गोष्टी घडत गेल्या. दाऊद इब्राहीम, राजू पुजारी, अबु सालेम यांसारखे डॉन देश सोडून पळाले. अरुण नाईक, सदा पावळे, नारी खान यांच्यासारखे डॉन पोलीसांच्या चकमकीत मारले गेले. या दोन्ही गोष्टी नेहमीच मुंबईच्या डॉन लोकांबाबतीत घडत गेल्या.
मात्र याला वरचढ ठरणारा तिसऱा डॉन निघाला, जो मुंबईतच राहिला. जो पोलीसांच्या चकमकींपासून पण वाचला आणि पुढे आमदार झाला. स्वत:चा पक्ष काढला. आपल्या कार्यकर्त्यांना मुलांना मुंबई महानगरपालिकेत निवडून आणलं. त्याच नाव अरुण गवळी. अरुण गवळीने एवढं सगळं कस साध्य केलं?, हा प्रश्न पडतो.?
अरुण गवळीची दगडी चाळ होणार जमीनदोस्त!
अरुण गवळीचं घर असलेल्या दगडी चाळीच्या जागी लवकरच टोलेजंग टॉवर उभारले जाणार आहेत. या दगडी चाळीचा पुनर्विकास करण्याचा निर्णय म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्विकास मंडळाने घेतला आहे. मंडळाचे अध्यक्ष विनोद घोसाळकर यांनी स्वतः ही माहिती दिली आहे. या चाळीतील सर्व इमारतींचा विकास केला जाणार आहे. प्राथमिक योजनेनुसार दगडी चाळीच्या जागी 40 मजली दोन टॉवर उभारण्यात येणार आहेत. यामध्ये मूळ भाडेकरुंसाठी घरं असतील आणि उर्वरित घरं विक्रीसाठी उपलब्ध असतील. दगडी चाळीत एकूण 338 भाडेकरु असून अरुण गवळी संपत्तीचा मालक आहे. अरूण गवळीनेच पुनर्विकासाठी म्हाडाकडे प्रस्ताव पाठवला होता.
दगडी चाळेशी कनेक्शन.!
डॉन अरुण गवळी आणि दगडी चाळ हे कनेक्शन कुख्यात आहे. गवळी डॅडी या नावाने समर्थकांमध्ये परिचित आहे. मुंबईतील भायखळा परिसरात असलेल्या दगडी चाळीतूनच डॉन अरुण गवळी याची सूत्रे हालत होती. ही चाळ अरुण गवळीची ओळख बनली होती. गवळीचे राहते घर असलेली चाळ ही एके काळी दहशतीचे ठिकाण झाले होते. आता या दगडी चाळीचा पुनर्विकास केला जाणार आहे.
अरुण गवळीची कारकीर्द
अरुण गवळी यांचा जन्म १७ जुलै १९५५ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे झाला. महाराष्ट्रात हिंदू अहिर जातीमध्ये त्यांचा जन्म झाला. त्याचे वडील गुलाबराव अहिर मिलमध्ये काम करायचे. गवळीचे पुणे जिल्ह्यातील वडगाव पंचपीर येथील मोहम्मद शेख लाल मुजावर नान्हुभाई यांच्या मुलीशी लग्न झाले. लग्नानंतर पत्नीने त्याचे नाव आशा गवळी ठेवले. डॅडी अरुण गवळीची बायको म्हणजे आशा गवळी. लोक तिला मम्मी म्हणतात. डॅडी शार्पशूटर असला तरी मम्मी डोक्याने शार्प होती. ती पद्धतशीरपणे नवऱ्याला यातून वाचवत आली. तिला महेश गवळी आणि गीता गवळी अशी दोन मुले आहेत.
अरुण गवळी सुरूवातीला कारखान्यात काम करण्याचा प्रयत्न केला. पण तो काही काळानंतर बंद पडला. त्यानंतर तो एका छोट्या किल्ल्यातील त्याच्या खोडलेल्या घरात परत आला आणि दाऊद इब्राहिम आणि छोटा राजन यांच्याशी संबंध बनवू लागला. जेव्हा पापा गवळीला त्याच्या माजी साथीदारांनी ठार केले तेव्हा त्याने गवळी नावाची टोळी सुरू केली. ज्याने मरणास गिरणीत मालमत्तेचे वाद आणि कामगार संघटना यांच्यावरून वाद निर्माण केला. अरुण गवळीला अरुण गवळीला डॉनच वलय मिळाल नव्हतं. पण मुंबईच्या भाईगिरीच्या चॅप्टरवर मात्र त्यांच्या नावाची दखल घेतली जात होती. नॅशनल सिक्युरिटी ॲक्टखाली अरुण गवळीला अटक करण्यात आली होती. त्यामध्ये त्याला चार वर्षे तुरूंगवासाची शिक्षा झाली होती. त्याला मुंबईच्या मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते.
गवळीचे वडील मध्यप्रदेशातून आले मुंबईत
मध्यप्रदेशातील खंडवा जिल्ह्यातून अरुण गवळीचे वडील गुलाबराव रोजगारासाठी मुंबईत आले होते. घरातील आर्थिक स्थिती ठीक नसल्याने अरूण गवळीला पाचवीतूनच शाळा सोडावी लागली. यानंतर वडिलांना मदत म्हणून तो घरोघरी जाऊन दूध विकण्याचा काम करू लागला. १९८० च्या दरम्यान गवळी राम नाईक गॅंगशी जोडला गेला. पुढे दाऊदसाठी तो काम करू लागला.
“तुमचा दाऊद तर आमचा गवळी.”
महाराष्ट्रात विधानसभेच्या इलेक्शनचा प्रचार सुरू होता. अशाच एका प्रचारसभेत कॉंग्रेस आणि प्रामुख्याने शरद पवार यांच्यावर तोफ डागत असताना बाळासाहेबांनी तुमचा दाऊद तर आमचा गवळी असं वाक्य उच्चारल्याच सांगण्यात येत. त्यासाठी आपल्याला पाच वर्षांपुर्वीचा इतिहास पहायला लागतो.
शिवसेनेचा आवाज तेव्हा विधानसभेत पोहचला होता. इकडे दाऊद हा मुंबईचा एकमेव डॉन झाला होता. त्याला फक्त एकच डॉन नडत होता. अरुण गवळी. अरुण गवळी तेव्हा दाऊदचा एकमेव दुश्मन होता. दाऊदच्या वर्चस्वाला हादरे देण्याच काम चालू होत. मुळच्या BRA अर्थात बाबू रेशीम आणि रमा नाईक या दोघांचा खून झाला होता. त्या गॅंगमधला फक्त अरूण गवळी राहिला होता. अरुण गवळी आणि दगडी चाळीची चांगलीच दहशत माजली होती.
१९९७ साली अरुण गवळीने राजकारणाचा श्रीगणेशा केला
अखिल भारतीय सेना नावाने पक्ष उभा केला. राजकारणात यावं हा सल्ला त्याला आशा गवळीने दिला होता. तिचं म्हणणं होतं की राजकारणाचा पाठिंबा राहिला तर अरुण गवळीला पोलीस कारवाईतून वाचवता येवू शकतं. त्यासाठी पक्षाची महिला शाखा देखील काढण्यात आली. आशा गवळीने महिला शाखा पुर्णपणे आपल्या ताब्यात ठेवली. पोलीस कारवाई करत असताना याच महिला शाखेच्या महिलांनी कित्येक वेळा अरुण गवळीला संरक्षण दिले. महिला असल्याने पोलीसांना कडक कारवाई करण्याच्या मर्यादा येत असत व त्याचाच फायदा गवळीला होत असायचा.
दाऊद दुबईत पळून गेल्यावर गवळीचे एकतर्फी राज
१९९३ मध्ये जेव्हा मायानगरी मुंबईत बॉम्बस्फोट झाले तेव्हा तेव्हा अंडरवर्ल्डचे सारे समीकरण बदलून गेले होते. बॉम्बस्फोटाच्या आधीच दाऊद दुबईला पळून गेला. दाऊद आणि छोटा राजन वेगवेगळे झाले. छोटा राजनने आपला मलेशियात व्यवसाय सुरू केला. त्यामुळे अरुण गवळीला मुंबईत आपले साम्राज्य उभे करण्याची संधी मिळाली. सुरुवातीला गवळीचा कारभार दगडी चाळीतून चालत असे. दरम्यान, त्याला शेकडो गुंड येऊन मिळाले व तोही अट्टल गुन्हेगार बनला.
मुलीचे लग्न लागताच न्यायालयाचा दणका
कुख्यात गँगस्टर अरुण गवळीच्या मुलीचा विवाहसोहळा संपन्न झाला. अभिनेता अक्षय वाघमारेसोबत योगिता गवळी आज (शुक्रवार 8 मे) विवाहबद्ध झाली. कन्यादान करताना ‘डॅडी’ अरुण गवळी भावूक झाल्याचं दिसत होतं. लॉकडाऊनचे नियम पाळून मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत हा विवाह पार पडला. मुलीचा विवाह सोहळा पार पडताच गवळीच्या पॅरोलमध्ये वाढ करण्यास मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने नकार दिला होता. न्यायालयाने अरुण गवळीला नवी मुंबईमधील तळोजा कारागृहात जाऊन सरेंडर करण्याचे आदेश दिले होते. अरुण गवळी पॅरोल वाढवून देण्यासाठी अर्ज केला होता.
डॅडी झाला आजोबा
दरम्यान, डॉन अरुण गवळी नुकतेच आजोबा झाला. अरुण गवळीची मुलगी योगिता गवळी-वाघमारे हिने नुकताच बाळाला जन्म दिला. अभिनेता अक्षय वाघमारे आणि योगिता गवळी लॉकडाऊनमध्ये विवाहबंधनात अडकले होते. अक्षय आणि योगिता यांचं लग्नही दगडी चाळीतच झालं होतं.
मुलीकडून गुन्हेगारीचा डाग पुसण्याचा प्रयत्न
योगिता गवळी ही डॅडीची मुलगी. आपले वडीलांनी अनेक प्रकारच्या केलेल्या करामीमुळे आपल्या मुलाला याचा भविष्यात त्रास होईल. मुले शाळेत गेल्यावर त्यांना इतर मुले “तुझा “डॅडी” गँगस्टर होता”, असे म्हणून त्रास देतील. या उद्देशाने तीने गुन्हेगारीचा डाग पुसण्याचा प्रयत्न करून समाजात एक नवी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यासाठी तीने दोन चित्रपटांची निर्मिती केली. त्यामध्ये २०१५ च्या ‘दगडी चाल’ या मराठी चित्रपटात मकरंद देशपांडे यांनी मुख्यत्वे अरुण गवळी यांच्या जीवनावर आधारित डॅडीची भूमिका साकारली होती. अंकुश चौधरी यांनी मुख्य भूमिका साकारली जी अरुण गवळीचा डावा हात होता. २०१७ चा हिंदी चित्रपट “डॅडी” गवळीच्या जीवनावर आधारित असून त्यात गवळीच्या भूमिकेत अर्जुन रामपाल आहे.
अरुण गवळीला जन्मठेप
मार्च २००७ रोजी मुंबईमधील असल्फा भागात कमलाकर जामसंडेकर यांची घरात घुसून गोळीबार करत हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी याप्रकरणी २००८ मध्ये अरुण गवळीला अटक केली. यानंतर २०१२ मध्ये विशेष न्यायालायनं अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती स्वप्ना जोशी यांच्या खंडपीठानं हा निकाल दिला. दरम्यान, गवळी याच्यासोबत इतरही त्याच्या ११ साथिदारांनाही जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी नागपूर मध्यवर्ती तुरुंगात शिक्षा अरुण गवळी जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत.