मुंबई : आज आर्यनच्या जामीन अर्जावर आज न्यायालयात सुनवाणी झाली. यावेळी आर्यनच्या वतीने प्रसिध्द वकिल अमित देसाई यांनी युक्तिवाद केला. मात्र आर्यन खानचा मुक्काम जेलमध्ये वाढला आहे. कार्डिलिया क्रूझ प्रकरणात अटकेत असलेल्या आर्यन खानला विशेष एनडीपीएस न्यायालयाचे व्हि व्हि पाटील न्यायमूर्तींनी जामीन नाकारला आहे. आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा या दोघांचा जामीन अर्ज देखील फेटाळण्यात आला आहे. या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी देखील प्रतिक्रिया दिली. नवाब मलिक यावेळी म्हणाले, 1 वर्षात NCB च्या केसेस मधील 90 टक्के केस फेक Fake आहेत.
आर्यन खानला आज जामीन मिळावा, हीच माझी प्रार्थना आहे; भाजप आमदार राम कदम
पुढे नवाब मलिक म्हणाले, एन डी पी एस च्या विशेष न्यायालयाने जामीन अर्ज नाकारला आहे. हा किला कोर्टात युक्तीवाद झाला. नवीन नवीन युक्तिवाद केला जातो. हे एक आंतरराष्ट्रीय रॅकेट आहे. NCB च्या प्रत्येक केस मध्ये युक्तिवाद बदलत जाते. आमच्या केसमध्ये सुद्धा NDPS न्यायालयात जमीन ला गेलो तेव्हा 5 लाख फायनान्सचा पुरावा आमच्याकडे असल्याचं दाखवलं गेलं होत. परंतु चार्जशीट मध्ये असा कोणताही उल्लेख नव्हता.
शिवसेना खासदार भावना गवळींना चिकन गुनियाची लागण; ईडीच्या चौकशीला हजर राहणार नाहीत!
हा खंडणी वसूल करण्याचा डाव आहे. तसेच काही लोकांना अडविण्याचा डाव असून आर्यन खान निर्दोष आहे हे आज किंवा उद्या हे सिध्द होईलच. ज्या whatsapp चॅटचा उल्लेख स्टेटमेंटमध्ये होता. तो मुळातच नाही आहे. NCB ने खोटे पुरावे सादर केले आहेत. दरम्यान या प्रकरणी आदेशाची प्रत मिळाल्यावर उच्च न्यायालयात जाऊन दाद मागणार असल्याचे आर्यनच्या वकिलांनी सांगितले आहे. आर्यनला मुद्दाम अडकविलं जात आहे. याबाबत आम्ही पुरावे गोळा करतोय. अशी प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी दिली.
देगलुरमध्ये भाजप उमेदवाराला निवडुण द्या, मी गाव जेवण देतो – चंद्रकांत पाटलांची ऑफर
या केस बद्दल जे पुरावे दाखवले जात आहेत ते सर्व समीर वानखेडे यांच्या कार्यालयातील फोटो आहेत. NCB ने फोटो हे मीडियाला, लोकांना देण्यात आले आहेत. त्याची माहिती काढली तर ती फेक केस असल्याची सिद्ध होईल. 1 वर्षात NCB च्या केसेस मधील 90 टक्के केस फेक आहेत. याबाबत PIL दाखल होतील. विशेष लोकांना त्रास देण्यासाठी आणि दहशत करण्यासाठी पैसे उकळण्याचं काम NCB कडून सुरू आहे. वानखेडेच्या नावाने पैसे मागत असल्याची तक्रार वर्सोवा पोलीस स्टेशन मध्ये आहे.
Read Also :
- भाजपच्या नेत्यांना आता लोकं कॉमेडी मॅन म्हणायला लागलेत – नाना पटोले
- उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात तब्बल अर्धातास खलबतं; दोन दिवसांत दुसऱ्यांदा भेट
- हिंमत असेल तर शिंगावर घ्या; नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना पुन्हा ललकारलं
- भ्रष्टाचाराची पाळंमुळं खणून काढणार, गरीबांना लुटणाऱ्यांना आमचं सरकार सोडणार नाही – नरेंद्र मोदी
- अजितदादा, मला परवानगी द्या, त्या किरीट सोमय्याला बघून घेतो – आमदार शशिकांत शिंदे