IMPIMP

“मोठा भाऊ म्हणून केंद्राने जबाबदारी घ्यावी, भेदभाव न करता भरीव मदत द्यावी” – एकनाथ शिंदे

पुणे : कोकणासह पश्चिम महाराष्ट्र आणि राज्यातील अन्य परिसराला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. त्यामुळे भागांचे पाहणी दौरे करण्यासाठी नेतेमंडळी सरसावली. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेतेमंडळींनी मदतकार्याचा आढावा घेतला. पंचनामे झाल्यानंतर मदत जाहीर करणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, मोठा भाऊ म्हणून आता केंद्राने जबाबदारी घ्यायला हवी. केंद्राने दिलेली मदत तुटपुंजी असून, केंद्र आणि राज्य भेदभाव न करता भरीव मदत द्या, असे नगरविकास मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

कायम पुराचा धोका असणाऱ्या गावांचा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावू – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

कोकणात महापुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी रोगराई पसरण्याची भीती आहे. त्यामुळे कँम्प राबवले जातायत. राज्य सरकारने पूरग्रस्तांना अधिकाधिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. एनडीआरएफ निकषांच्या बाहेर जाऊन मदत करण्यात येत आहे. पंचनामे झाल्यावर येत्या दोन दिवसात पॅकेज जाहीर केले जाईल. पॅकेज जाहीर करणे अत्यंत आवश्यक आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

फडणवीस-ठाकरे आले पुन्हा एकत्र, अवघ्या ५ मिनिटांच्या चर्चेत दडलंय तरी काय? 

सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातदेखील पूरग्रस्त गावांत शिवसेनेची आरोग्य शिबीरे सुरू करण्यात आली आहेत. यासाठी ठाण्यातील धर्मवीर आनंद दिघे मोफत फिरता दवाखाना शिरोळ तालुक्यातील नरसोबाची वाडी, जैनापूर येथे दाखल झाला असून आरोग्य शिबिरांना सुरुवात झाली आहे. रुग्ण सेवा देणाऱ्या मोबाईल व्हॅनमधून शिरोळ येथील पद्माराजे विद्यालयांमध्ये असणाऱ्या पूर बाधितांची आरोग्य तपासणी करून तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्यांना आवश्यक ती औषधे पुरवण्यात आली आहेत. या ठिकाणी जवळपास २५० पूर बाधितांनी या सेवेचा लाभ घेतला, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

जेव्हा गरज असेल तेव्हा केंद्राची मदत घेऊ, मात्र वेड्यावाकड्या मागण्या करून पॅकेज जाहीर करणार नाही! 

दरम्यान, मी पॅकेज देणारा नव्हे तर मदत करणारा मुख्यमंत्री आहे. त्यामुळे महापुराच्या अस्मानी संकटात कोणत्याही सवंग घोषणा करणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. कोल्हापूर-सांगलीतील अनेक लोकांच्या घरातील पूराचे पाणी अजून ओसरलेले नाही. आता कुठे स्थानिक सावरत आहेत. त्यामुळे नुकसानीचा नेमका अंदाज आलेला नसल्याने मदतीची घोषणा केलेली नाही. तातडीची मदत म्हणून १० हजार रुपये देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शिरोळ व कोल्हापूर शहरातील पूरग्रस्त भागांस भेट देवून त्यांनी पूरग्रस्तांच्या भावना जाणून घेतल्या.

Read Also :

Total
0
Shares
Previous Article

पंतप्रधानांनी यावेळी तरी महाराष्ट्रावरून घिरटी मारावी आणि गुजरातला देतात तशी तातडीची मदत द्यावी!

Next Article

"गुजरात मॉडेल हा मोदींचा खोटेपणा, 'चायवाला' सांगून त्यांनी देशाला मुर्खात काढलं"

Related Posts
Total
0
Share