मुंबईसह उपनगरात तुफान पाऊस कोसळत आहे. या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी गुढघाभर पाणी साचले आहे यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेना आणि महापालिकेवर टीका केली आहे. “आयुक्तांच्या दाव्याचे पावसाने तीन तेरा वाजवले, 113 टक्के नालेसफाईचे दावे करणारे कुठे आहेत,” असा प्रश्न आशिष शेलार यांनी उपस्थित केला
पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याने आशिष शेलारांनी घणाघात केला आहे. “मुंबईत 113 टक्के नालेसफाई झाल्याच्या आयुक्तांच्या दाव्याचे पावसाने अखेर तीन तेरा वाजवलेच! हे होणारच होते, कारण 40 टक्क्यांपेक्षा जास्त नालेसफाई झालेली नाही,” असे ट्विट आशिष शेलार यांनी केले आहे.
“आता कुठे आहेत ते 113 टक्क्यांचे दावे करणारे? कोट्यवधीची कंत्राटे देऊन कंत्राटदारांची पाठराखण करणारे सत्ताधारी आता गायब?” असा प्रश्नही आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.
मुंबईत 113% नालेसफाई झाल्याच्या आयुक्तांच्या दाव्याचे पावसाने अखेर तीन तेरा वाजवलेच! हे होणारच होते, कारण 40% पेक्षा जास्त नालेसफाई झालेली नाही.
आता कुठे आहेत ते 113% चे दावे करणारे?
कोट्यवधीची कंत्राटे देऊन कंत्राटदारांची पाठराखण करणारे सत्ताधारी आता गायब?— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) July 15, 2020
मुंबईत तुंबलेल्या पाण्याचे सत्ताधाऱ्यांना उत्तर द्यावेच लागेल ! @bjp4mumbai pic.twitter.com/tkAgJr2k4m
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) July 15, 2020