मुंबई – महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा शनिवारी करण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावरुन आता भाजप नेते जोरदार टीका करताना पाहायला मिळत आहे. महापालिकेच्या सत्तेची खुर्ची डळमळली तेव्हाच मुंबई’करां’ची आठवण झाली, अशा शब्दात भाजप आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय.
आशिष शेलार यांनी सरकारच्या निर्णयाचा चांगलाच समाचार घेतला. त्यातबरोबर त्यांनी सरकारकडे महत्वाची मागणीही केली आहे. आतापासूनच नाही तर वचन दिलेत त्या तारखेपासून 500 चौरर फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर पूर्ण माफ करा. अती श्रीमंत सोडून ज्या मध्यमवर्गीयांची घरं 500 चौ. फु. पेक्षा मोठी आहेत, त्यांचाही 500चौ. फु. पर्यंतचा कर माफ करा? 500 चौ. फु.पर्यंतच्या दुकानदारांही हीच सुट देणार का?, असे प्रश्न शेलार यांनी विचारले आहेत.
सरकारच्या तिजोरीत खडखडाट होता तरीही प्रथम बिल्डरांना प्रिमियममध्ये 11 हजार कोटींची सुट दिलीत
बार,पब,रेस्टॉरंटना लायसन्स फी मध्ये सवलत दिलीत
विदेशी दारुला करात 50% सुट दिलीत
वायनरींवर पण सवलतींची खैरात झाली..
आता पालिकेच्या सत्तेची खुर्ची डळमळली तेव्हा मुंबई"करां"ची आठवण झाली!
1/2— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) January 2, 2022
त्याचबरोबर ‘सरकारच्या तिजोरीत खडखडाट होता तरीही प्रथम बिल्डरांना प्रिमियममध्ये 11 हजार कोटींची सुट दिलीत. बार, पब, रेस्टॉरंटना लायसन्स फी मध्ये सवलत दिलीत. विदेशी दारुला करात 50 टक्के सुट दिलीत. वायनरींवर पण सवलतींची खैरात झाली. आता पालिकेच्या सत्तेची खुर्ची डळमळली तेव्हा मुंबई”करां”ची आठवण झाली!’, अशी खोचक टीकाही शेलार यांनी शिवसेनेवर केलीय.
सरकारच्या तिजोरीत खडखडाट होता तरीही प्रथम बिल्डरांना प्रिमियममध्ये 11 हजार कोटींची सुट दिलीत
बार,पब,रेस्टॉरंटना लायसन्स फी मध्ये सवलत दिलीत
विदेशी दारुला करात 50% सुट दिलीत
वायनरींवर पण सवलतींची खैरात झाली..
आता पालिकेच्या सत्तेची खुर्ची डळमळली तेव्हा मुंबई"करां"ची आठवण झाली!
1/2— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) January 2, 2022
Read also:
- मुंबै बँकेवर प्रविण दरेकरांचा झेंडा; सहकार पॅनेलचा सर्व 21 जागांवर विजय
- याची ग्रामपंचायत सदस्य व्हायची लायकी नाही आणि म्हणे भावी खासदार; आमदार गोरंट्यालांची खोतकरांवर टीका
- शिवसैनिक म्हणून आम्हाला जगू द्या, दुसरी कोणतीही मागणी नाही; राष्ट्रवादीच्या कुरघोड्यांमुळे आढळराव हतबल?
- १३ महापालिकांत होणार ओबीसी आरक्षणाविना निवडणुका; निवडणूक आयोगाचा राजकीय पक्षांना मोठा धक्का
- मी अजित पवारांचा मोठा फॅन; भाजप आमदार जयकुमार गोरेंनी उधळली दादांची स्तुतीसुमने