शिर्डी (अहमदनगर): राज्यातील सर्वात श्रीमंत असलेल्या साई संस्थानच्या अध्यक्षपदासाठी चांगलीच रस्सीखेच सुरु झाली होती. साई संस्थान हे खूप मोठे संस्थान आहे. राजकीय आणि सामाजिक पार्शवभूमी असलेल्या साई संस्थानाला विशेष महत्व आहे. अध्यक्षपदासाठी जिल्ह्यातील चार आमदारांची नावे चर्चेत आलेली होती . अध्यक्षपदासाठी नेमकी माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे लक्ष लागले होते. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये साई संस्थानच्या अध्यक्षपदासाठी चुरस लागलेली असताना अखेरीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बाजी मारली आहे. Ashutosh Kale elected as Chairman of Sai Baba Sansthan Trust
हे पण वाचा, साई संस्थानच्या अध्यक्षपदी आमदार निलेश लंके यांची नियुक्ती करण्यासाठी ‘या’ ग्रामपंचायतीने मांडला ठराव
हे पण वाचा, साई संस्थानाच्या अध्यक्षपदाबाबतीत सत्यजित तांबे व आशुतोष काळे यांच्या नावासाठी मुबंईत खलबतं
मुंबईत महाविकास आघाडी समन्वय समितीची बैठक काल संध्याकाळी पार पडली. या बैठकीला राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आदी उपस्थित होते. या बैठकीत अहमदनगर महापौर पद, महामंडळ नियुक्त्या, साई संस्थान अध्यक्षपद, पंढरपूर विठ्ठल-रुख्मिणी संस्थान विश्व्स्तपदाबाबत निर्णय घेण्यात आला आहे. शिर्डी साईबाबा संस्थानचे अध्यक्षपद राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांच्याकडे तर पंढरपूरच्या विठ्ठल-रुख्मिणी देवस्थानचे विश्व्स्तपद काँग्रेसकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच महामंडळ नियुक्त्या देखील येत्या १५ दिवसांत जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
हे पण वाचा, अजित पवारांच्या अज्ञात वासाचे केंद ‘अंबालिका’त भेट झाल्याचे वृत्त माजी मंत्री राम शिंदे यांनी फेटाळले
हे पण वाचा, गोपीचंद पडळकरांचा कर्जत-जामखेड मधील थेट वावर राम शिंदेची डोकेदुखी वाढवणारा
महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची बैठक पार पडल्यानंतर नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे. काही महामंडळाचे वाटप देखील झालेले आहे मात्र अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार आहेत. तिन्ही पक्षांना समसमान वाटप आणि अपक्षांनाही हिस्सा देण्यात येणार असल्याचे बैठकीत ठरले आहे. तसेच महाविकास आघाडी सरकार मध्ये कसलाही विसंवाद नाही अथवा काहीही अलबेल नाही असे मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
हे पण वाचा,
नगरच्या महापौर पदाच्या दावेदार रोहिणी शेंडगे यांचा मार्ग सुकर; रिता शैलेश भाकरेंची बिनशर्त माघार
राहुरी तालुक्यासाठी महाविकास आघाडीतील मामा-भाचे वापरणार आपले ‘राजकीय’ वजन
अगस्ती सहकारी साखर कारखान्यात मोठ्या राजकीय घडामोडींना वेग; सर्व संचालकांनी दिले राजीनामे
“निळवंडे धरणाच्या कामाला एकही रुपया कमी पडू देणार नाही” जलसंपदा मंत्री जयंत पाटील