मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याच्या कथित कटामध्ये मला गोवण्याचा प्रयत्न केला गेला होता, असा धक्कादायक दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. लोकसत्ता या वृत्तपत्राच्या एका कार्यक्रमात बोलताना प्रकाश आंबेडकरांनी हा खळबळजनक दावा केला आहे.
मला गोवण्याचा प्रयत्न झाल्यानंतर मी संबंधितांना इशारा दिला की मला तुम्ही गोवून दाखवा तुम्हाला युद्ध काय आहे ते दाखवून देतो, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
वंचित बहुजन आघाडीवर सातत्याने भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला जातो. यावर बोलताना ते म्हणाले की, मी भाजपला मदत करतो, हा आमच्या राजकारणाला बदनामा करण्याचा डाव आहे. पाचशे कोटी मिळाले, तडजोडी केली, अशा कंड्या आमच्याविषयी पिकविल्या जातात. दुसरीकडे मोदी सरकारच्या दबावापुढे सारे राजकीय पक्ष दबून गेले आहेत. ते थेट भूमिका घेत नाहीत. मी थेट भूमिका घेतो. मी डागाळलेला नाही. त्यामुळे मोदी सरकार मला हात लावू शकत नाही. त्यामुळे मला पंतप्रधानांना मारण्याच्या कटात गोवण्याचा प्रयत्न झाला, असा दावा त्यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि डावे यांच्यासाठी मी अस्पृश्य झालोय आणि त्यामुळेच ते मला भाजपकडे ढकलण्याचा प्रयत्न करत आहे. मी स्वतःचा मालक आहे. भाजपसोबत जायचं की नाही हा माझ्या पक्षाचा निर्णय आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Read Also :
- काश्मिरमध्ये दहशतवाद्यांच्या गोळीबारात भाजप नेत्याचा मृत्यू
- ‘भाजप सामाजिक वाद निर्माण करून राजकीय पोळी भाजतंय’
- कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५ लाखांची आर्थिक मदत, परिवहनमंत्र्यांची घोषणा
- ‘लोक मोदींकडे पाहून भाजपला मतदान करतात, शिवसेनेलाही बाळासाहेबांमुळेच सत्ता मिळाली’
- ‘….तर ते पवारांना ओळखत नाहीत’, फडणवीस-पवार भेटीचा शिवसेनेकडून उलगाडा