अयोध्येतील श्री राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम 5 ऑगस्ट रोजी पार पडणार आहे. हा ऐतिहासिक दिवस असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते देशातील निवडक नामवंतांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरु आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला.
माननीय प्रधानमन्त्री श्री @narendramodi जी जिस दिन अयोध्या में श्रीराम जन्मभूमि मन्दिर का निर्माण प्रारम्भ करने के लिये पूजन कर रहे होंगे, वह स्वतन्त्र भारत का एक ऐतिहासिक अवसर होगा। कार्यक्रम का सीधा प्रसारण दूरदर्शन द्वारा किया जायेगा व अन्य सभी चैनल भी उसे प्रसारित करेंगे।
— Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra (@ShriRamTeerth) July 25, 2020
विशेष म्हणजे हा कार्यक्रम लोकांना टिव्हीवर पाहता येणार आहे. या कार्यक्रमाचं अयोध्येतून थेट प्रक्षेपण डीडी नॅशनल वृत्तवाहिनीवरून केलं जाणार आहे. या संदर्भात श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने ट्विट करत माहिती दिली आहे
श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने ट्विट केले की, पंतप्रधान नरेंद्र ज्या दिवशी राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी अयोध्येत असतील, तो स्वतंत्र भारताच्या इतिहासातील ऐतिहासिक क्षण असेल. या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण दूरदर्शनवरून केलं जाणार आहे. त्याचबरोबर इतर वाहिन्याही कार्यक्रमाचं प्रक्षेपण करणार आहेत.