पत्रकार राजू परुळेकर यांनी काही दिवसांपुर्वी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीमध्ये त्यांनी अनेक गौप्यस्फोट केले होते. आता पुन्हा एकदा राजू परूळेकर यांनी द इन्साइडेरसाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीचा टीझर परुळेकर यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
लवकरच…
कधीकधी प्रश्न संपतच नाहीत.
त्याचं प्रश्नोपनिषद तयार होतं.
पण @bb_thorat हे मोठे मुरब्बी नेते आहेत.
ते जिथे पोहचले आहेत तिथे ते का आहेत ते कळतं.
शिवाय युतीच्या तिढ्याबद्दलही…
बघा…#Collage
👇 pic.twitter.com/jy9M4lGLVP— Raju Parulekar (@rajuparulekar) July 17, 2020
या मुलाखतीमध्ये बाळासाहेब थोरात महाविकास आघाडी सरकार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, भाजप-शिवसेना अशा विविध मुद्यांवर भाष्य करताना दिसत आहे. सोबतच महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करताना काय समस्या आल्या तेही सांगत आहे. संपुर्ण मुलाखत आल्यावरच या सर्व गोष्टींचा खुलासा होईल.
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांचे सरकार स्थापन करताना मुलभूत पेचप्रश्न काय होते ? या प्रश्नाचे उत्तर देताना भाजपला बाहेर ठेवण्याचे पहिले धाडस शिवसेनेने केले, असे थोरात म्हणाले.