सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विभाजनाचा प्रस्ताव आपल्याला न विचारता मंजुरीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत मांडल्यांने, अशोक चव्हाण नाराज आहेत. अशोक चव्हाण यांनी कडक शब्दात मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
“अशोक चव्हाण आणि मी भेटतो. आम्ही पक्षात एकत्र आहोत. अशोक चव्हाणांच्या नाराजी ही बातमी कदाचित पेरली असेल. खाते विभाजन हा विषय आहे, पण त्यावर योग्य चर्चा करुन निर्णय घेतला जाईल. आम्ही थोडी काळजी घेतली तर अजून चांगलं काम होईल”, असं बाळासाहेब थोरात म्हणाले
बाळासाहेब थोरात म्हणाले, “महाविकास आघाडी किमान समान कार्यक्रमवर बनलेली आहे. सरकारचे काम चांगल्या पद्धतीने सुरु आहे. आम्ही पुढे व्यवस्थित काम करु. विरोधी पक्ष त्यांचे आमदार आश्वासक वाटावे यासाठी विरोधी पक्षनेते काम करतात. आम्ही थोडी काळजी घेतली पाहिजे. एकमेकांची काळजी घेतली पाहिजे, मग सरकारमध्ये अडचण येणार नाही”