पुणे : निवडणुकीच्या कालावधीत राजकीय पक्ष आणि उमेदवारांना आपले विचार मतदारांपर्यंत पोहोचविणे महत्त्वाचे असते. त्यासाठी सध्याच्या काळातील महत्वाचा ठरणार घटक म्हणजे सोशल मिडीया. आता याच सोशल मिडीयाच्या माध्यमातून शहराच्या तळागाळतल्या लोकांपर्यत पोहचण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी शठ्ठू ठोकला आहे. आगामी महापालिका निवडणुक वेळेत होणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सोशल मिडीयावरील फेसबूक, इन्स्टाग्राम, ट्विटर, युट्यूबरचे फॉलोअर्स, सबक्राईबर्स वाढवा. माध्यमांवर सक्रीय होवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचाराच्या पोस्ट दिवसातून २० नाही किमान एकतरी शेअर करा. स्वतच्या सोशल मिडीयावरील मित्रांपर्यंत आपला प्रचार – प्रसार पोहचवू द्या, असे आवाहन जगताप यांनी पदाधिकाऱ्यांना केले आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नवनिर्वाचित पुणे शहर कार्यकारणीच्या पहिल्या बैठकीला संबोधित करताना त्यांनी आवाहन केले.
48 तासात दरेकरांनी माफी मागावी, अन्यथा दिसेल तिथे गाठून तोंड काळ करू – राष्ट्रवादी आक्रमक
आपल्या केलेल्या कार्याच्या गोष्टी आपणच शेअर केल्या पाहिजे असे नाही. पुणेकरांच्या विकास कामांच्या कार्याच्या किती पोस्ट तुम्ही शेअर करत हे महत्वाचे आहे. राष्ट्रवादी काँग्सेस पक्षाच्या दिवसातून २० ते २५ पोस्ट सोशल अकांऊंटवर पडत असतील. तरी लोड घेवू नका. फक्त दिवसातून किमान एक ते दोन पोस्ट शेअर करा. एक, दोन पोस्ट शेअर करायला तुम्हाला काय बिघडतं?, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
महापालिका निवडणुका वेळेतच होणार
भाजपच्या काही लोकांकडून चुकीचा मॅसेज दिला जात आहे. २०२२ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुका पुढे ढकलल्या जाणार आहेत. तीन ते चार महिने पुढे ढकलल्या जातील, अशा प्रकारचा मॅसेज भाजपच्या काही लोकांकडून दिल्या जात आहे. मात्र, यात काही तथ्य नाही. आगामी महापालिका निवडणुका वेळेतच होणार आहे. त्यानुसार, पक्ष स्थरावर मोर्चेबांधणी झाली आहे. त्यामुळे, कंबरकसून कामाला लागा, असेही जगताप यांनी यावेळी सांगितले.
१५ मार्च २०२२ ला राष्ट्रवादीचा महापौर
येत्या काही काळात प्रभाग रचना केल्या जाईल. त्यामध्ये एक प्रभार असो किंवा दोन प्रभाग, परंतू तुम्ही तुमच्या सभोवतालचा परिसराचा अभ्यास करा. त्यालाच प्रभाग समजून कामाला लागा. १० ते १२ जानेवारी २०२२ ला आचारसंहिता लागेल. १५ फेब्रवारीपर्यंत मतदानासहित निकाला लागलेला असेल. आणि १५ मार्च २०२२ ला पुणे महापालिकेत राष्ट्रवादीचाच महापौर असेल. त्यामुळे, राज्य पातळीवर देश पातळीवरील सर्व मंडळींचे लक्ष अजित पवार आणि शरद पवारांच्या नेतृत्वातील पुणे महापालिकेतील ऱाष्ट्रवादीच्या काँग्रेस पक्षाच्या निकालाकडे लागले पाहिजे, असेही जगताप यांनी सांगितले.
Read Also :
- चित्राताई, उद्यापासून बदामाचा खुराक सुरू करा, बुद्धीला चढलेला गंज कमी होईल – रुपाली चाकणकर
- स्वप्न पुर्ण झालं: लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकरांसह दिग्गजांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश
- परमबीर सिंग यांना उच्च न्यायालयाचा झटका; याचिका फेटाळून लावली
- पत्नीला न सांगताच सासऱ्याच्या घरावर बुलडोझर चालविलेला; नितीन गडकरींनी सांगितला ‘तो’ किस्सा
- ठाकरे सरकारच्या अध्यादेश म्हणजे उशिरा सुचलेले शहाणपण – देवेंद्र फडणवीस