सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणीला आता आणखी एक नवे वळण मिळालं आहे. हिंदी कलाविश्वात आपल्या अभिनयाच्या बळावर ओळख प्रस्थापित करणाऱ्या अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाला आथा दर दिवसाआड एक नवं वळण मिळू लागले आहे. ज्यामध्ये आता सुशांतनं त्याच्या आत्महत्येपूर्वी नेमकं इंटरनेटवर काय सर्च केले होते , याचा खुलासा झाला आहे.
मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी माध्यमांशी संवाद साधताना याबाबतच्या एका अहवालातील माहिती सर्वांपुढे मांडली. ज्यामघ्ये गुगलवर सुशांतनं त्याचं स्वत:चं नाव सर्च केले होते . जवळपास दोन तासांसाठी त्यानं हा शोध घेतला. ज्याशिवाय त्यानं बायपोलर डिसऑर्डरचाही शोध घेतल्याची माहिती समोर आली.
१४ जूनला सुशांतनं आत्महत्या केली. त्यापूर्वी त्याने स्वत:बाबतची काही माहिती वाचली. शिवाय सुशांतची मॅनेजर असणाऱ्या दिशा सॅलिन हिच्या नावचे सर्चही त्याने केले होते . दिशाच्या आत्महत्या प्रकरणाशई आपले नाव वारंवार जोडलं जाण्याच्या घटनेचाही त्याला जबर धक्का बसल्याचे म्हटले जात आहे. ज्यामुळे तो वारंवार याच गोष्टी सर्च करत होता. सुशांतने आत्महत्या करण्याच्या अवघ्या पाच दिवसांपूर्वी दिशाने आत्महत्या करत आपले आयुष्य संपवले होते.