भुसावळ – भुसावळ नावाची जिल्ह्यात नव्हे तर राज्यात नेहमीच चर्चा होते. १७ डिसेंबर रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत खडसे समर्थक भाजपा नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. या संदर्भात भाजपा नगरसेविका पुष्पाबाई बात्रा यांनी जिल्हाधिकार्यांकडे राष्ट्रवादीत दाखल झालेल्या भाजपा नगरसेवकांना अपात्र ठरवण्यासाठी याचिका दाखल केली आहे. त्यामुळे या नगरसेवकांमागे आता कायद्याचा ससेमिरा लागला आहे. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दहा नगरसेवकांना नोटिसा बजावल्या आहेत. याप्रकरणी १४ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे भुसावळच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
राज्यात लॉकडाऊन लागणार? टास्क फोर्सची बैठक संपली, काय ठरलं नेमकं, वाचा सविस्तर…
भुसावळ पालिकेत माजी मंत्री एकनाथ खडसे आणि आमदार संजय सावकारे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाची सत्ता आली होती. मात्र, खडसेंनीही भाजपा सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांच्यापाठोपाठ भुसावळमधील खडसे समर्थक भाजपा नगरसेवकांनीसुद्धा नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे संतप्त झालेल्या भाजपाने आता या नगरसेवकांविरोधात याचिका दाखल केली आहे. दरम्यान, या नगरसेवकांनी बुधवारी जामनेर येथे जाऊन आमदार गिरीश महाजन यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली. भुसावळच्या राजकारणात आता महाजन यांची एन्ट्री झाली असून, भविष्यात खडसे व महाजन यांचा कलगीतुरा पाहायला मिळेल.
रावसाहेब दानवे-अब्दुल सत्तारांची दिल्लीत गळाभेट; राजकीय तर्कवितर्कांना उधाण
नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह नगरसेवक अमोल इंगळे, लक्ष्मी मकासरे, सविता मकासरे, प्रमोद नेमाडे, मेघा वाणी, ॲड. बोधराज चौधरी, शोभा नेमाडे, किरण कोलते, शैलजा नारखेडे यांना नोटीस मिळाली आहे. त्यामुळे यावर एकनाथ खडसे काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
Read also:
- “आव्हाडांनी ओबीसींचा अपमान केला”, असं म्हणणाऱ्या विरोधकांना आव्हाडांचे सडेतोड उत्तर…
- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या केसालाही कुणी धक्का लावू शकत नाही – देवेंद्र फडणवीस
- मुंबई लोकल पुन्हा बंद? राज्यात विकेंट लॉकडाऊन लागणार? राजेश टोपेंचं मोठं विधानं
- मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर अटकेची टांगती तलवार; परळी कोर्टाकडून अटक वॉरंट जारी
- काँग्रेस आमदार आपल्याच मंत्र्यांवर नाराज, पटोलेंना डावलून थेट दिल्लीत जाणार?