तापेमध्ये काहीही खाल्ले तरी त्याची चव लागत नाही. तोंड कडू पडते. अशावेळी दही-भात खाणे फायदेशीर असते. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. यामधील रोगप्रतिकारक तत्त्व आणि अँटीऑक्सीडेंट्स तापेचा प्रतिकार करण्यात फायदेशीर असते.तोंड आल्यास दह्याचा वापर दिवसातून दोन ते तीन वेळा करावा.
दह्यात मोठ्या प्रमाणात असलेल्या प्रोटीन, कॅल्शियम व विटॅमिनमुळे आरोग्य व सौंदर्य टिकवण्यात हे उपयोगी आहे.दह्यात कॅल्शियम असते ज्यामुळे हाडांना मजबूती मिळते.दह्यामधील गुड बॅक्टेरिया पोटाचे कार्य सुधारण्यात मदत करतात. तसेस दह्यामध्ये पाणी असल्यामुळे बध्दकोष्ठतेची समस्या होत नाही. अपचन किंवा पित्त असल्यास जेवणात दही-भात खाणे फायदेशीर असते.
ज्यांना भूक कमी लागते त्यांनी दह्याचे नियमित सेवन करावे.दह्यात हृदयरोग, उच्च रक्तदाब व फुफ्फुसाचे आजार थांबवण्याची क्षमता आहे. रात्री झोप येत नसल्यास दररोज दह्याचे सेवन करा. झोपेची समस्या हळू हळू कमी होईल.दह्याच्या नियमित सेवनाने आतड्यांचे रोग व पोटासंबंधित आजार बरे होतात. दह्याचे नियमित सेवन शरीरासाठी अमृतासमान मानले जाते. दह्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता तसेच थकवा दूर होतो.