आपल्याकडे प्रामुख्याने उपवासालाच साबुदाणा खाल्ला जातो. आपल्यापैकी अनेकांना साबुदाणा खाण्याचे फायदे कदाचितच माहिती असतील. आपल्यापर्यंत येताना साबुदाण्यावर अनेक प्रक्रिया केल्या जातात. साबुदाणा हा सॅगो पाम नावाच्या झाडाच्या खोडातून निघणाऱ्या चिकापासून बनतो शिजल्यानंतर तो पारदर्शक आणि नरम होतो. पहिल्यांदा हा दिसायला अतिशय तरल असतो. त्यानंतर मशीनच्या सहाय्याने याला मोत्यासारखा आकार देण्यात येतो. आज आपण जाणून घेऊयात साबुदाणा खाण्याचे फायदे :-
- वजन वाढवायचं असेल तर साबुदाण्याचं सेवन तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं.
- वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी तसेच उर्जा मिळवण्यासाठी साबुदाणा मदत करतो.
- साबुदाण्यात कॅल्शियम, लोह आणि मॅग्नेशियमची चांगलं प्रमाण असते. जे हाडे मजबूत करण्यासाठी फायदेशीर ठरते.
- तुम्ही सकाळी साबुदाण्याचा एखादा पदार्थ खाल्ला तर तुम्हाला दिवसभर थकवा जाणवत नाही.
- साबुदाण्यात फायबर, पोटॅशियम आणि फॉस्फोरस असते जे तुमच्या वाढत्या रक्तदाबाला नियंत्रणात आणण्यासाठी मदत करते.
- शरीरातील आढळणाऱ्या लाल पेशींची कमतरता आणि कमजोरीमुळे लोह कमी असल्याने एनिमिया आजार होतो. ही समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला साबुदाण्याचा फायदा करून घेता येतो.
- रक्ताभिसरण चांगलं करण्यासाठी साबुदाण्याचं सेवन करावं.
- साबुदाण्यातील फायबर आणि प्रोटीन हे पचनक्रियेच्या प्रणालीला अधिक चांगलं करण्यासाठी मदत करतं.
- साबुदाणा आपल्या त्वचेसाठीही उत्तम ठरतो. यामध्ये जिंक, कॉप आणि सेलेनियमचं प्रमाण असतं. त्वचेसाठी या तिनही गोष्टी फायदेशीर असतात.