खर आपल्या शरीरासाठी चांगली नसते हे आपल्याला ठाऊक असूनही आपण दिवसातून किमान २ वेळा चहा पितो. अनेक जन मधुमेहाचे रुग्ण असले तरी चहा पिणे सोडत नाहीत. आज आम्ही चहा आवडणाऱ्यांसाठी साखरेला एक भारी पर्याय सांगणार आहोत. साखरेऐवजी मध घालून चहा पिणे हा एक अत्यंत चांगला पर्याय आहे. त्यामुळे आपल्या शरीरातील साखर नियंत्रणात येते.
मधाचे इतर आरोग्यदायी फायदे
- शरीरातील प्रतिकारकशक्ती वाढण्यासही मदत मिळते.
- साखर नियंत्रणात येण्यास मदत होते.
- साखर पचवण्यापेक्षा शरीरात मध पचवणं सहज सोपं आहे.
- पचनक्रिया सुधारण्यासाठीही फायदा होतो.
- सर्दी – खोकला यासाठी औषध म्हणून तुम्ही मधाचा चहा बनवून दिल्यास त्याचा शरीराला जास्त प्रमाणात फायदा होतो.
साखरेऐवजी चहात मध घालून पिणं जास्त सोयीस्कर आणि शरीराला लाभदायक आहे.