मुंबई: वरळी डोम येथे आयोजित ‘मराठी विजयी मेळावा’ सध्या जोरदार चर्चेत आहे. हिंदी भाषा सक्तीचा जीआर रद्द झाल्यानंतर हा मेळावा मराठी अस्मितेचा विजय म्हणून साजरा होत आहे. या मेळाव्याला भरत जाधव, तेजस्विनी पंडित यांच्यासारख्या मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली आहे. मेळाव्याचे मुख्य आकर्षण म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची बहुप्रतीक्षित भाषणे. आज या मेळाव्यादरम्यान अभिनेते भरत जाधव यांना सुशील केडिया नावाच्या व्यावसायिकाने केलेल्या एका ट्विटबद्दल प्रश्न विचारण्यात आला. केडिया यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते की, ते तीस वर्षांपासून मुंबईत राहत असूनही त्यांना मराठी येत नाही, आणि विशेष म्हणजे त्यांनी राज ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला होता.
हेही वाचा…मनसेच्या ‘मराठी’ दणक्यावर: राणे-देशपांडे आमनेसामने!
भरत जाधव यांची संतप्त प्रतिक्रिया
यावर प्रतिक्रिया देताना भरत जाधव म्हणाले, “30 वर्ष संपत आलीयत का त्यांची?. बघा, प्रत्येक जण आपापलं मत व्यक्त करतोय. मला असं वाटतं की, मराठी माणसाने जागं व्हायला हवं. मराठीपणा जपायला हवा.” त्यांनी पुढे स्पष्ट केले की, “मी असं म्हणत नाही की आपण हिंदीच्या विरोधात आहोत. हिंदीपण चांगलं आहे. पण हिंदी सक्तीची नसावी, या गोष्टीवर आपण ठाम आहोत.”
हेही वाचा…ठाकरे बंधू अठरा वर्षांनी एकत्र: मराठी विजय मेळावा ठरणार ‘सुवर्ण क्षण’
“मराठी बोलायची लाज कसली?”
व्यवसाय करून महाराष्ट्रात स्थायिक झालेल्या आणि मराठी भाषा न बोलणाऱ्या लोकांवर भरत जाधव यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “इथे व्यवसाय करता, तर मराठी बोलायची लाज कसली तुम्हाला? मी 30 वर्ष इथे राहतो हे अभिमानाने कशाला सांगता?”
मीरा-भाईंदर येथील घटनेचा संदर्भ देत, जिथे काही दुकाने बंद करून लोकांना वेठीस धरण्यात आले, त्यावर पत्रकारांनी भरत जाधव यांना प्रश्न विचारला. “इथली जमीन, पैसा वापरून तुम्ही श्रीमंत झाला आहात, हे कितपत योग्य आहे?” या प्रश्नावर जाधव म्हणाले, “हे चुकीचं आहे. इथे तुम्ही बिझनेस करता, निदान मराठी माणसावर राज्य करता, तुम्ही त्यांनाच लांब करता हे चुकीचं आहे. मी निषेध व्यक्त करतो. राजकीय परिस्थितीवर बोलताना, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य एकत्र येण्याबद्दल विचारले असता, भरत जाधव यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “दोन्ही ठाकरे एकत्र राहिलेत तर चांगलंच आहे.” या मेळाव्यामुळे मराठी भाषा आणि अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे.
शिंदेंच्या ‘जय गुजरात’ घोषणेवरून राऊतांचा टोला: “सत्तेसाठी आता मुजराही करतील!”
दिशा सालियन प्रकरण पुन्हा तापले: राणे-ठाकरे गटात शाब्दिक युद्ध, राऊतांकडून माफीची मागणी!
मुंबईत ‘ठाकरे’ एकजुटीचा विजयी मेळावा: राऊतांचा शिंदे गटावर हल्लाबोल, ‘बूट चाटण्या’चा टोला!
पुण्यात अमित शाहंकडून बाजीराव पेशव्यांना मानवंदना: “एकही युद्ध न हरलेला एकमेव सेनापती!”