मुंबई: महापुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या चिपळूण शहराचा दौरा काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली. यावेळी त्यांनी शहरातील व्यापाऱ्यांना धीर देताना पूरग्रस्तांसाठी नुकसानभरपाईची सर्वकष योजना जाहीर केली जाईल असंही सांगितलं. मात्र मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यामधील एका घटनेमुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना आणि खास करुन शिवसेनेला चांगलच धारेवर धरलं आहे.
हे पण वाचा: दादा, तुम्हीच आमचे वाली; चिपळूणच्या व्यापाऱ्यांची नारायण राणेंना आर्त हाक
शिवसेनेचे स्थानिक आमदार भास्कर जाधव यांनी एका महिलेला मुख्यमंत्र्यांसमोरच केलेल्या दमदाटीमुळे आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने, कोकणी माणूस आगामी निवडणुकीमध्ये भास्कर जाधवांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असं म्हटलं आहे.
हे पण वाचा: पुणे महानगर नियोजन समितीची मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक
या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी ट्विटरवरुन भास्कर जाधावांना इशारा दिलाय. ‘भास्कर जाधव, आज त्या अगतिक महिलेवर जो हात उघारलाय ना.? तोच हात पुढच्या पाच वर्षांनी जोडून जेव्हा मतं मागायला याल, तेव्हा हाच कोकणी माणूस तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही,’ असं शालिनी ठाकरे म्हणाल्या.
हे पण वाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातारा दौऱ्यावर, पूर परिस्थितीची करणार पाहणी
नेमकं काय घडलं ?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या चिपळूण शहराचा दौरा केला. यावेळी त्यांनी शहरातील व्यापाऱ्यांना धीर देताना पूरग्रस्तांसाठी नुकसानभरपाईची सर्वकष योजना जाहीर केली जाईल असंही सांगितलं. मात्र मुख्यमंत्री व्यापाऱ्यांशी चर्चा करीत असतानाच एका महिलेने ओक्साबोक्शी रडत तिची वेदना मांडली. ‘पुराचे पाणी माझ्या घराच्या छतापर्यंत पोहोचलं, त्यात सर्वकाही वाहून गेलंय. तुम्ही काहीही करा, पण आम्हाला मदत करा. मदत केल्याशिवाय जाऊ नका हो’, अशी विनवणी तिने केली.