मुंबई : शिवसेना नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा व स्वछता मंत्री गुलाबराव पाटील यांनी एका कार्यक्रमादरम्यान बोलताना भाजपसह केंद्रिय मंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ‘सायकल चोरणारे नारायण राणे मंत्री झाले’. स्वार्थासाठी लोक आपला बाप बदलतात अशा शब्दात जोरदार टीका गुलाबराव पाटील यांनी केली आहे. त्यावेळी ते सांगोला येथे बोलत होते.
तुम्ही चारवेळा मुख्यमंत्री होते, पण माझ्यासारखं सलग पाच वर्ष राहता आले नाही; फडणवीसांचा पलटवार
गुलाबराव पाटील म्हणाले की, सायकल चोरणारे नारायण राणे मंत्री झाले असा घणाघात पाटील यांनी केला आहे. त्याचबरोबर त्यांनी पुढे ED च्या कारवाईंवरुनही भाजप पक्षावर (BJP) निशाणा साधला आहे,’ आमची सत्ता व्यवस्थित आहे म्हणूनच 50 हजारांच्या भ्रष्टाचाराचा आरोप झाला की ईडीची चौकशी लावली जात आहे, असा आरोप देखील गुलाबराव पाटील यांनी केला आहे.
निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान; संभाजी भिडेच्या वक्तव्याने राज्यात खळबळ
दरम्यान, पुढे बोलाताना गुलाबराव पाटील म्हणाले, ‘आम्हाला जेल नवी नाही, बॅचलर ऑफ जेल म्हणजे शिवसैनिक आहे. एवढं लक्षात ठेवा. बोकडाला मरण ही परमेश्वर ठरवतो मग आमचं मरण ED ठरवणार आहे का?, असा प्रश्नही पाटील यांनी उपस्थित केला आहे.
Read Also :
- पंकजाताई, सत्तेत असताना तुम्ही मंत्रीपद भाड्याने दिले होते का? धनंजय मुंडेचा पलटवार
- साखर कारखान्याचा संचालक झाल्यावर लग्न कसं जमलं? अजित पवारांनी सांगितला भन्नाट किस्सा!
- गोपीनाथ मुंडेंनी माझ्या कानात कुर्रर्र केलंय, मेलो तरी ताईची साथ सोडणार नाही – महादेव जानकर
- रोहित पवारांच्या संकल्पनेतून देशातील सर्वात मोठा ‘स्वराज्य ध्वज’ फडकला; शिवरायांच्या घोषणांनी आसमंत दुमदुमला
- वेळ आली तर तुमच्यावर जीव सुध्दा ओवाळून टाकेन; पंकजा मुंडेंची भगवानगडावर तुफान फटाकेबाजी