अकोला : गेल्या काही महिन्यांपासून राजकारणात सक्रिय असलेले, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी, आज सकाळी फेसबुक लाइव्ह आणि दूर दृश्य व्हिडिओच्या माध्यमातून एक व्हिडीओ पोस्ट केला असून, एक मोठी घोषणा केली आहे. तसेच, कार्यकर्ते, नेते आणि पदाधिकाऱ्यांनाही याद्वारे सूचना केली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणूका पुढे ढकला…ठाकरे सरकारकडून पुन्हा एकदा आयोगाला विनंती
ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांची व्हिडिओद्वारे अतिशय महत्वपूर्ण घोषणा! वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी, पदाधिकारी आणि प्रसारमाध्यमांनी याची नोंद घ्यावी ही विनंती!
फारुक अहमद
प्रदेश प्रवक्ता – वंचित बहुजन आघाडी
महाराष्ट्र@Prksh_Ambedkar pic.twitter.com/vFxEDgOx1w— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) July 8, 2021
यामध्ये त्यांनी, “वैयक्तीक कामासाठी मी सामाजिक आणि पक्षाच्या राजकीय, दैनंदिन कामकाजातून ३ महिन्यांसाठी दूर राहणार आहे. पण असे असले, तरी पक्ष चालला पाहिजे. आपण ज्या आंदोलनाची सुरुवात केली आहे, ते सुरु राहिले पाहिजे. ५ जिल्ह्यात निवडणुका होणार आहेत आणि म्हणूनच निर्णय प्रक्रियेसाठी पक्षाला अध्यक्ष असला पाहिजे. त्यामुळे, वंचित बहुजन आघाडीच्या प्रभारी प्रदेशाध्यक्षपदी रेखा ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली असून, महाराष्ट्र कमिटी त्यांना सहकार्य करेल”, असे आंबडेकर यांनी सांगितले आहे.
‘बाळ’कडू प्यायलेला कोकणचा भूमिपुत्र, आता ‘मोदीं’चा मंत्री; असा आहे राजकीय प्रवास
वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी, पदाधिकारी आणि प्रसारमाध्यमांनी याची नोंद घ्यावी ही विनंती! @VBAforIndia pic.twitter.com/pezJFwou9y
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) July 8, 2021
दरम्यान, आंबेडकर यांच्या या घोषणेनंतर, राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरु झाल्या आहेत. आपल्या पक्षाच्या अध्यक्षांनी, असा निर्णय का घेतला, असा सवाल वंचितच्या कार्यकर्त्यांकडून विचारण्यात येत आहे. दुसरीकडे, “डॉ. अरुण सावंत महाराष्ट्र कमिटी, जिल्हा कमिटी आणि सर्व कार्यकर्त्यांनी पक्षाच्या पुढच्या यशस्वी वाटचालीसाठी आणि आगामी निवडणुकांच्या विजयासाठी रेखा ठाकूर यांना सहकार्य करावे,” असे देखील आवाहन आंबेडकर यांनी आपल्या व्हिडिओत कार्यकर्त्यांना केले आहे.
Read Also :
- काँग्रेसचे नाना पटोले व सुनील केदार यांचे भर पावसात सायकल आंदोलन
- राणेंना मिळालेलं मंत्रीपद, त्यांच्या कारकिर्दीला साजेसं नाही! मात्र आमच्या शुभेच्छा!
- भुजबळ आणि फडणवीस एकाच व्यासपीठावर, कार्यकर्ते मात्र बाहेर एकमेकांशी भिडले
- पवारांनी मला फोन करून मनापासून शुभेच्छा दिल्या, मुख्यमंत्री ठाकरेंचे मन मात्र तेवढे मोठे नाही – राणे
- आजारी खडसेंची ईडीकडून चौकशी सुरु, दिली पहिली प्रतिक्रिया म्हणाले…