मुंबई: राज्यातील काँग्रेस पक्षाच्या सर्व मंत्र्यांची काल टिळक भवन येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यलयात प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थीत बैठक पार पडली, यावेळी शिवसेनेचे उपनेते, तीन वेळचे आमदार आणि माजी राज्यमंत्री अशोक शिंदे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांचे स्वागत केले.
हे पण वाचा: “या सरकाराला आव्हान, तुमच्यात दम नसेल; तर आम्हाला सांगा ४ महिन्यात आरक्षण देतो”
शिवसेनेचे वर्धा जिल्हा संपर्कप्रमुख आणि माजी खासदार अनंत गुढे आणि अशोक शिंदे यांच्यात तीव्र मतभेद निर्माण झाले होते. अशोक शिंदे यांनी मुंबईला जाऊन शिवसेना पक्षनेतृत्वाकडेही गुढे प्रकरणात न्याय मागितला होता, परंतु सेनेच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्यांची दखल घेतली नसल्याचं बोललं जातं. त्यानंत अशोक शिंदेंनी शिवबंधन सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
हे पण वाचा: मोठी बातमी : पूरग्रस्तांसाठी ११ हजार ५०० कोटींचं पॅकेज, ठाकरे सरकारचा निर्णय
कोण आहेत अशोक शिंदे?
अशोक शिंदे हे वर्ध्यातील हिंगणघाट मतदारसंघातून तीन वेळा आमदार , १९९५, १९९९ आणि २००९ असे तीन वेळा शिवसेनेकडून आमदार, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराकडून पराभव, मनोहर जोशी यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात शिंदेंकडे राज्यमंत्रिपद, अशोक शिंदेंकडे शिवसेनेचे उपनेतेपद होते, जुलैमध्ये पक्षाला रामराम ठोकला आहे.
Read Also :
- ठाकरे सरकारच्या ११ हजार ५०० कोटींच्या पॅकेज बाबत देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
- राज्य किल्ले योजनेत अनेक त्रुटी, संभाजीराजे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत स्वतःला झोकून देऊन काम करा – नाना पटोले
- शरद पवार आणि अमित शहा यांच्यातल्या भेटीचा उलघडा, मात्र ‘त्या’ १५ मिनिटांच्या भेटीत काय झालं?
- क्लिपमधला “तो” आवाज संजय राठोड यांचाच, पुणे पोलिसांनी दिला अहवालाला दुजोरा