पुणे : गेल्या काही महिन्यांपासून ईडीच्या रडारवर असलेले पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले, यांच्या तब्बल ४ कोटी रुपयांच्या संपत्तीवर ईडीने जप्तीची कारवाई केली आहे. ABIL (अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड) या पुण्यातील कंपनीची जागा ईडीने जप्त केली आहे. ज्या जागेवर ही अत्याधुनिक इमारत उभी आहे, त्या जमिनीची किंमत जवळपास ४ कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे.
मुख्यमंत्र्यांचे एकच धोरण, सगळं केंद्राने करावं, द्याव; मी घरात बसणार किंवा मर्सिडीज चालवणार
पुण्यातील एका जमिनीवर भोसले यांनी बांधकाम केलं आहे, जी सरकारी होती. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. तसेच, ईडीनेदेखील या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे. याच अनुषंगाने ईडीने त्यांना मुलाला समन्स बजावून चौकशीसाठी बोलावलं होतं. त्याप्रमाणे त्यांची ५ तास कसून चौकशी करण्यात आली होती आणि त्यांना सोडून देण्यात आलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा ईडीने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारलेला आहे.
“लक्षात ठेवा! राष्ट्रवादीला आम्ही कधीही बुडवू”, शिवसेना नेत्याचे खळबळजनक विधान
दरम्यान, या प्रकरणी ईडीने ११ फेब्रुवारीला भोसलेंशी संबंधित ४ ठिकाणांवर छापे टाकले होते. एकदा त्यांना चौकशीसाठी बोलवून, नंतर त्यांना सोडून देण्यात आलं आणि पुन्हा दोघांना १२ फेब्रुवारीला चौकशीसाठी बोलावण्यात आलं मात्र, हे दोघेही चौकशीसाठी हजर झाले नाहीत. यानंतर भोसले यांनी ईडीविरोधात दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आणि याचिका दाखल केली होती.
मुंबईची लोकल रेल्वे भाजपाची नोकर आहे का? संजय राऊतांचा रावसाहेब दानवेंना प्रश्न
ईडीकडून भोसले यांची आत्तापर्यंत ४० कोटी ३४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली असून, फेमा कायद्याअंतर्गत ईडीने त्यांची पुणे आणि नागपुरातील मालमत्तांवर जप्ती आणली आहे. तसेच, हे एक प्रकरण सोडून अजून एका विदेशी चलन प्रकरणात त्यांची याआधीही दोन वेळा चौकशी झाली आहे. विशेष म्हणजे! त्यांनी दक्षिण मुंबईत एक डुप्लेक्स फ्लॅट खरेदी केला असून, या फ्लॅटसाठी त्यांनी १०३ कोटी ८० लाख रुपये मोजले आहेत, त्यामुळे ते मध्यंतरी बातम्यांत झळकले होते.
Read Also :
- आमच्याकडे क्यूआर कोड, पास तपासण्याची यंत्रणा नाही; राज्य सरकारनेच ती उभारावी – रावसाहेब दानवे
- मोदी सरकार आज दुरुस्ती विधेयक लोकसभेत मांडणार; मराठा आरक्षणाचा मार्ग सुकर होणार?
- ‘‘कुणी विचारलं तर पालकमंत्र्यांनी निर्णय घेतला सांगा’’, अजित पवारांचा आरोग्यमंत्र्यांना अप्रत्यक्षपणे टोला
- मोठी बातमी! उद्यापासून पुणे अनलॉक, दुकाने आता दिवसभर खुली, तर हॉटेल रात्री १० पर्यंत सुरु
- भाजप आमदार-खासदारांच्या दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठका, दिल्लीत महाराष्ट्राविषयी काही शिजतंय का?