मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर ईव्हीएम संदर्भात विरोधकांकडून सातत्याने शंका उपस्थित केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार उत्तम जानकर यांनी या मुद्यावर आक्रमक भूमिका घेतली असून त्यांनी आता मोठा निर्णय घेतला आहे. ते लवकरच ईव्हीएम आणि निवडणूक आयोगाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे, ही मागणी त्यांनी केली आहे.
हेही वाचा…भाजपने चिटींग करून महाराष्ट्रात निवडणूक जिंकली..! राहुल गांधींनी थेट पुरावाच दिला
आमदार उत्तम जानकर यांनी दावा केला आहे की, बॅलेट कंट्रोल आणि व्हीव्हीपॅट मशीन चुकीच्या पद्धतीने जोडून गैरप्रकार करण्यात आला आहे. त्यांनी यासंदर्भात आधीच निवडणूक आयोगाला वेळ दिला होता, मात्र आता चार दिवस बाकी असताना त्यांनी हायकोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे. “राहुल गांधी आणि सुप्रिया सुळे यांनी कितीही आवाज उठवला तरी निवडणूक आयोग दाद देत नाही, त्यामुळे न्यायालयाचाच मार्ग पत्करला आहे,” असे जानकर यांनी स्पष्ट केले आहे.
या मुद्द्यावर अधिक दबाव वाढवण्यासाठी जानकर यांनी मोठ्या लाँग मार्चचे आयोजन केले आहे. मारकडवाडी ते शिवाजी पार्क असा हा पायी लाँग मार्च काढला जाणार आहे. या मार्चमध्ये राष्ट्रवादीचे खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना ठाकरे गट नेते आदित्य ठाकरे यांच्यासह काँग्रेस नेते आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
हेही वाचा…ठाकरे गटाच्या खासदारांची वज्रमुठ, पत्रकार परिषद घेत जाहिर केली भूमिका
हा मार्च 19 फेब्रुवारी रोजी सुरू होणार असून, रोज 15 किलोमीटर अंतर पार करत 21 दिवसांनी शिवाजी पार्कवर पोहोचेल. या मोर्चाच्या समारोपासाठी 18 मार्च रोजी शिवाजी पार्कवर भव्य सभा आयोजित करण्यात येणार आहे. या सभेला काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. या आंदोलनामुळे सरकारवर दबाव वाढण्याची शक्यता असून ईव्हीएमच्या मुद्द्यावर आता पुन्हा एकदा तीव्र चर्चा रंगण्याची चिन्हे आहेत.
आमदार जानकर यांनी सांगितले की, “मतदान प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर गडबड होत असल्याने न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. अनेक सामाजिक कार्यकर्तेही यासाठी मैदानात उतरणार आहेत. काँग्रेसने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. तसेच 20-25 वकील हायकोर्टात जाऊन निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याची मागणी करणार आहेत.” या पार्श्वभूमीवर हा लाँग मार्च आणि न्यायालयीन प्रक्रिया यामुळे ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर मोठी चर्चा होण्याची शक्यता असून सरकार आणि निवडणूक आयोगाला यावर उत्तर द्यावे लागणार आहे.
हेही वाचा…मोठी बातमी..! लाडक्या बहीण योजनेतून ५ लाख महिलांना अपात्र करण्याचा निर्णय, यादी आली समोर
हेही वाचा…“एक रेड्याचं शिंग नक्की आणणार अन्…” संजय गायकवाड राऊतांवर भडकले
हेही वाचा…“त्यामुळेच राहुल गांधींची आता रडारड सुरू झालीय”, भाजपचा राहुल गांधींवर पलटवार
हेही वाचा…कृषी विभागातील सर्वात मोठा घोटाळा..! धनंजय मुंडेंच्या अडचणी आणखी वाढल्या
हेही वाचा…“तोच विनोद पुन्हा-पुन्हा..”, राहुल गांधींच्या दाव्यावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया