पालघर : जिल्हा परिषद, महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युती आणि आघाडींबाबत चर्चेच्या फेऱ्या सुरु आहेत. राज्यातील सर्वाधिक लक्ष लागलं आहे ते म्हणजे मनसे आणि भाजपची युती होणार की नाही याकडे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महिन्यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर, मनसे-भाजप युतीच्या चर्चांना जोर आला आहे. त्यातच आज पुण्यात मनसे नेत्यांनी भाजपसोबत युतीची जाहीर मागणी केली आहे. असं असताना राज्यातील पहिली मनसे आणि भाजपची अखेर पालघरमध्ये झाली आहे.
आम्ही ठरवलंय, ठाकरे सरकारचा ऑटो पंक्चर करायंचा अन् बदलाय घ्यायचा – भाजप
पालघर जिल्ह्यात पोटनिवडणुकीसाठी मनसे आणि भाजप एकत्र आले आहेत. पालघर जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणूक होत आहे. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात भाजप आणि मनसे युती झाली आहे. पालघर भाजप अध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी यााबाबतची अधिकृत घोषणा केली आहे. जिल्ह्यात इतर ठिकाणीही या संदर्भात चर्चा सुरु आहे.
नक्षलवादी भागात विकास करण्यासाठी 1200 कोटींचा निधी द्या – उद्धव ठाकरे
पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) भाजपशी युती करावी, असा आग्रह मनसेच्या स्थानिक नेत्यांनी धरला आहे. तसे केल्यास या निवडणुकीत मनसेला फायदा होईल, असे या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी नुकताच पुण्याचा दौरा केला होता. आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी पुण्यातील प्रभाग रचनेत बदल होण्याची शक्यता आहे. यादृष्टीने मनसेकडून अंतर्गत चाचपणी मोहीम सुरु आहे. यावेळी मनसे नेत्यांच्या एका गटाने आगामी निवडणुकीसाठी भाजपसोबत युती करावी, असा आग्रह धरला आहे. त्यामुळे आता राज ठाकरे काय भूमिका घेणार, हे पाहावे लागेल.
दिल्लीत जेवणाच्या टेबलवर उद्धव ठाकरे शहांच्या बगलमध्ये; एकमेकांच्या बाजूला बसून नेमकं काय शिजलं?
पालघर जिल्हापरिषदेत 57 सदस्यांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेना 18, राष्ट्रवादी 17, भाजप 12, माकप 5, बहुजन विकास आघाडी 4, तर काँग्रेसचा एक असे सदस्य निवडून आलेले आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि अपक्ष मिळून बहुमताचा आकडा पार करत महाविकास आघाडीनं जिल्हा परिषदेवर सत्ता मिळवली आहे. मात्र, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून न्यायालयाने जिल्हा परिषदेतील 15 सदस्य, तर पालघर, डहाणू, वाडा आणि वसई या चार पंचायत समिती मधील 14 सदस्यांचे सदस्यत्व रद्द केलं होतं.
Read Also :
- अडसुळ अडकले, आता हसन मुश्रीफांना कुणीच वाचवू शकणार नाही; किरीट सोमय्याचा दावा
- राष्ट्रवादीच्या नेत्याची ऑफिसमध्येच आत्महत्या; सुसाइड नोटमध्ये धक्कादायक खुलासा
- आरोग्य विभागाची स्थगित झालेली परीक्षा ‘या’ दिवशी; राजेश टोपेंनी सांगितली तारीख
- राजसाहेब, भाजपशी युती करा, निवडणुकीत फायदा होईल; पुण्यातील मनसे नेत्यांचा दबाव वाढला
- काँग्रेसच्या विनंतीनंतर भाजपाची माघार; राज्यसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होणार