बडौत : उत्तर प्रदेशच्या बागपतमध्ये भाजपा नेत्याची राहत्या घरात गळादाबून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भाजपा नेते आणि माजी मंत्री राहिलेल्या आत्मराम तोमर यांची हत्या करण्यात आली आहे. आत्मराम तोमर यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरात सापडला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आला आहे. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.
राष्ट्रवादीच्या बैठकीवर आणि मुख्यमंत्री-पवार यांच्या भेटीवर अजित पवार म्हणतात…
बडौतच्या बिजरौल रोड येथे आत्माराम तोमर यांचं निवासस्थान आहे. टॉवेलचा वापर करुन आत्माराम तोमर यांचा गळा दाबून त्यांची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. त्यांची कार देखील गायब झाली आहे. तोमर यांचा ड्रायव्हर विजय आज सकाळी जेव्हा तोमर यांच्या घरी पोहोचला तेव्हा दरवाजा आतून बंद होता आणि कार जागेवर नव्हती. दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यानंतर बेडवर तोमर यांचा मृतदेह होता आणि त्यांच्या चेहऱ्यावर टॉवेल पडलेला होता. त्यानंतर ड्रायव्हरनं तात्काळ पोलिसांना पाचारण केलं.
ठाकरे कुटुंबाची मर्जी राखण्यासाठी धडपड, महिलांवरील अत्याचाराबाबत नीलम गोऱ्हे यांचे मौन का?
आत्माराम तोमर जनता वैदिक कॉलेजचे मुख्य प्राध्यापक देखील राहिले आहेत. त्यांनी १९९३ साली छपरौली विधानसभा मतदार संघातून भाजपाच्या तिकीटावर निवडणूक देखील लढवली होती आणि १९९७ साली भाजपानं त्यांना मंत्रिपद देखील दिलं होतं.
Read Also :
- शिवसेनेला अजून एक धक्का : माजी खासदार आनंदराव अडसूळ, मुलगा, जावयाकडे ईडीच्या धाडी
- साताऱ्यात उदयनराजे-शिवेंद्रराजे समर्थकांत तुफान राडा, ६ गंभीर जखमी १६ जणांविरोधात गुन्हा
- परमबीर सिंग आणि भाजपचं साटंलोटं? नवाब मलिकांनी केला गंभीर आरोप
- भुजबळ म्हणतात, सत्य परेशान होता है, पराजित नहीं! सोमय्या म्हणतात, आगे आगे देखो, होता है.!
- अजित पवार जरंडेश्वर कारखान्याची कागदपत्रं उघड करण्याची हिंमत का दाखवत नाहीत? – किरीट सोमय्या