मुंबई : भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ठरल्याप्रमाणे आज दुपारी १ च्या सुमारास पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारमधील अजून एका मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आणि शेकडो कोटींचा घोटाळा केल्याचे आरोप केले आहेत. अनिल परब, अनिल देशमुख अशा सत्ताधारी मंत्र्यांनंतर आता किरीट सोमय्या यांनी आपला मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे वळवला आहे. मुश्रीफ यांनी केलेल्या घोटाळ्यांचे तब्बल २७०० पानी पुरावेच आपण आयकर विभागाकडे सादर केल्याचं किरीट सोमय्या यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केलं. तसेच, फक्त हसन मुश्रीफच नाही, तर त्यांच्या पूर्ण कुटुंबाच्या नावे हे पुरावे असल्याचं ते म्हणाले. त्याशिवाय, यासंदर्भात मंगळवारी ईडीकडे अधिकृत तक्रार दाखल करणार असल्याचं ते म्हणाले.
भर बैठकीत शिवसेना आमदार छगन भुजबळांवर भिडला; पालकमंत्री आणि सुहास कांदेमध्ये जोरदार खडाजंगी
“मी राज्य सरकारमधील ११ भ्रष्टाचारी मंत्र्यांची यादी जाहीर केली होती. पण दुर्दैवाने ११ जणांच्या टीममध्ये राखीव खेळाडूंची संख्या वाढायला लागली आहे. हसन मुश्रीफ यांचं नाव राखीव खेळाडूंमध्ये आम्ही वाढवत आहोत. हसन मुश्रीफ परिवाराने शेकडो कोटींचे घोटाळे केले आहेत. बोगस कंपन्या, शेल कंपन्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणार आर्थिक गैरव्यवहार, बेनामी संपत्ती केल्याचे माझ्याकडे २७०० पानांचे पुरावे आहेत. ते मी आयकर विभागाला सोपवले आहेत”, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
राज्यसभेच्या उमेदवारीसाठी काँग्रेस पक्षात रस्सीखेच, ‘या’ नेत्यांची नावे आघाडीवर
“CRM Systems PVT LTD इथे प्रविण अगरवाल ऑपरेट करतात. या कंपनीतून हसन मुश्रीफ यांचे सुपुत्र नाविद मुश्रीफ यांनी दोन कोटींचं लोन घेतल्याचं दाखवलंयय. या कंपनीवर २०१७-१८मध्ये प्रतिबंध आला होता. त्या कंपनीतून ज्यांनी एंट्री घेतली, त्यांच्यावर कारवाई सुरू झाली आहे. त्याच कंपनीतून नाविद मुश्रीफ यांनीही निवडणुकीसाठी फॉर्म भरला होता. त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात दाखवलंय की सीआरएम कंपनीत २ कोटी ४५ लाख ३५४ एवढी रक्कम दाखवली आहे. सीआरएम ही शेल कंपनी असल्याचं सिद्ध झालं आहे”, असा दावा सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केला.
शिवसेना आणि राष्ट्रवादीचे ते नेते कोण? सोमवारी फुटणार राजकीय बॉम्ब
“मरू भूमी कंपनीत ३ कोटी ५ लाख रक्कम दाखवली आहे. बाप-बेटे दोघांविरोधात १२७ कोटींचे तर पुरावे आहेत आमच्याकडे. हसन मुश्रीफ यांच्या विधानसभा निवडणूक प्रतिज्ञापत्रात पत्नीच्या अकाऊंटमध्ये सर संताजी घोरपडे साखर कारखान्याचे ३ लाख ७८ हजार ३४० रुपयांचे शेअर्स दाखवले आहेत. शाएदा हसन मुश्रीफ यांच्या नावाने. २०१८-१९ मध्ये मुश्रीफ परिवारावर आयकर विभागाचे सर्च झाले. त्यातून आलेली माहिती दडपण्याचा प्रयत्न झाला. त्यात १४७ कोटी रुपयांचे पुराव्यानिशी बेनामी व्यवहार सिद्ध झाले आहेत. हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबाने सर सेनापती संताजी-धनाजी साखर कारखान्यात १०० कोटींहून अधिक भ्रष्टाचाराचा पैसा पार्क केला आहेत, असे गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केले आहेत.
‘आता निवडणुका घ्याव्याच लागणार?’, न्यायालयाचा ठाकरे सरकारला झटका
“उद्या मुंबई ईडीकडे अधिकृत तक्रार दाखल करणार आहे. २७०० पानांचे पुरावे त्यांना देणार आहे. परवा दिल्लीला अर्थविभाग, ईडी, कंपनी मंत्रालय इथे देखील हे पुरावे मी सादर करणार आहे. ठाकरे सरकारच्या डर्टी घोटाळा ११ मध्ये राखीव खेळाडूंची भरती चालूच राहणार आहे. माझ्याकडे २ मंत्र्यांच्या फाईल तयार होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना. आज एनसीपीच्या एका मंत्र्याचा घोटाळा उघड केला आहे. काही दिवसांनी शिवसेनेच्या मंत्र्यांचा देखील घोटाळा उघड करू”, असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे.
Read Also :
- गायिका म्हणून नव्हे तर, राजकीय नेत्याची बायको म्हणून लोक माझ्याकडे बघतात – अमृता फडणवीस
- ‘जिल्हा परिषदेच्या निवडणुका ओबीसी विरुद्ध ओबीसीच होणार!’ वडेट्टीवारांचं विधान
- अनिल परबांच्या अडचणीत वाढ; वांद्रे येथील अनधिकृत कार्यालयावर बुलडोझर फिरवण्याचे आदेश
- भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी मला पैशांची ऑफर दिली होती; आमदार पाटील यांचा गौप्यस्फोट
- साताऱ्यात भाजपला धक्का : आमदार शिवेंद्रराजेंच्या कट्टर समर्थकानी हातावर बांधले घड्याळ