बीड : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचा व त्यांच्या कुटुंबीयांच्या घातपाताचा कट आखल्याप्रकरणी आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी परळी पोलिसांनी, करूणा शर्मा-मुंडे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांच्या गाडीतून पोलिसांनी पिस्तूल जप्त केले होते. त्यामुळे, परळीसह राज्यात मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान, त्यांनतर करुणा शर्मा-मुंडे यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
धनंजय मुंडे, करुणा शर्मांचे फोटो टाकून FB वर बदनामीकारक पोस्ट; फडणवीस, पवारांबद्दल अश्लिल ‘मजकूर’
याप्रकरणी आज करुणा शर्मा-मुंडे यांच्या जामिनावर न्यायालयात सुनावणी होणार होती. मात्र, त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आता नवीन तारखेप्रामणे पुढील सुनावणी १८ सप्टेंबरला होणार आहे. त्यामुळे त्यांचा तुरुगांतील मुक्काम वाढला आहे. तपास अधिकारी आणि सरकारी वकिलांकडून लेखी बाजू मांडली गेली, तसेच फिर्यादी गैरहजर असल्याने ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली असल्याचे सांगितले आहे.
भाजपा करुणा शर्मा यांच्या पाठीशी; प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची ग्वाही
दुसरीकडे, शर्मा यांच्या वकिलाने पोलीस याप्रकरणात जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला. शर्मा यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमांतून धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत, पत्रकार परिषद घेऊन मोठा खुलासा करणार असल्याचे सांगितले होते. त्यासाठी परळीत आल्या असता, वैद्यनाथ मंदिर परिसरात दर्शनासाठी आलेल्या महिलांशी त्यांची बाचाबाची झाली आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करत एका महिलेने त्यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला.
थोबाड आणि गाल आम्हालाही रंगवता येते; प्रवीण दरेकरांचे रुपाली चाकरणकरांना प्रत्युत्तर
दुसरीकडे, करुणा शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल ठेवल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक पिवळी ओढणी तोंडाला बांधलेली तरुणी, शर्मा यांच्या गाडीच्या डिक्कीत काहीतरी संशयास्पद वस्तू ठेवत असल्याचे या व्हिडीओतून दिसून येत आहे. याप्रकरणी करुणा शर्मा यांनी देखील, “परळीत आल्यानंतर आपल्या गाडीकडे जमाव धावून आला होता,” अशी तक्रार शहर पोलिसात दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी ७०-८० जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
Read Also :
- ‘माझ्यावर यशवंतराव चव्हाणांचे संस्कार’, दरेकरांच्या विधानावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
- थोबाड आणि गाल आम्हालाही रंगवता येते; प्रवीण दरेकरांचे रुपाली चाकरणकरांना प्रत्युत्तर
- दरेकरांच्या भाषणबाजीने झाली पक्षाची गोची, आक्षेपार्ह विधानावर पाटील म्हणतात…
- ‘…म्हणूनच पवारांनी राष्ट्रवादीची नवी माडी बांधली,’ दानवेंचा काँग्रेसला जोरदार टोला
- राज्यातील ‘असुरक्षित’ सावित्रीच्या लेकींसाठी अखेर मुख्यमंत्री आले धावून