नवी दिल्ली : नुकतंच प्रशांत किशोर यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर प्रशांत किशोर यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चेनं जोर धरला आहे. राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
…म्हणून नाना पटोले यांचे फोन चोरुन ऐकण्यात आले, संजय राऊतांनी केला खुलासा!
२०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला तोडीसतोड आव्हान देण्यासाठी आणि देशातील प्रमुख विरोधीपक्ष म्हणून काँग्रेसची मोर्चेबांधणी करण्यासाठी प्रशांत किशोर यांनी राहुल गांधी यांच्यासोबतच्या भेटीत चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. याबाबतचं वृत्त ‘एनडीटीव्ही’ वृत्तवाहिनीनं दिलं आहे.
नाना पटोले काय बोलतात, कसे डोलतात यावर सरकारचं भवितव्य; सामना मधून पटोलेंचं कौतुक आणि कानपिचक्याही
प्रशांत किशोर यांनी मंगळवारी राहुल गांधी यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. यावेळी चर्चेत प्रियांका आणि सोनिया गांधी देखील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाल्या होत्या, अशी माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे अशी चर्चा काही पहिल्यांदाच झालेली नाही असंही सांगण्यात येत आहे.
पंकजा मुंडे नाराज नाहीत, राजीनामे न देण्याचं कार्यकर्त्यांना आवाहन – चंद्रशेखर बावनकुळे
प्रशांत किशोर आणि गांधी कुटुंबियांमध्ये झालेली बैठक आगामी पंजाब किंवा उत्तर प्रदेश विधानसभेच्या मुद्द्यावरुन नसून त्याहूनही मोठी चर्चा या बैठकीत झाल्याचं सांगण्यात येत आहे. २०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रशांत किशोर यांना काँग्रेसकडून मोठी भूमिका दिली जाण्याची शक्यता असल्याची चिन्हं आहेत.
Read Also :