पुणे : काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत राज्यातील २२ जिल्ह्यांमधले निर्बंध शिथिल केले होते. तसेच मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात आपत्ती व्यस्थापन विभागाला निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले होते. त्यानुसार त्यांनीही या भागात निर्बंध शिथिल केले. मात्र, दुसरीकडे राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये लेव्हल ३ चे निर्बंध कायम ठेवताना, नवी नियमावली राज्य सरकारने जाहीर केली होती. या जिल्ह्यांत पुण्याचाही समावेश होता.
भाजप आमदार-खासदारांच्या दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठका, दिल्लीत महाराष्ट्राविषयी काही शिजतंय का?
दरम्यान, राज्य सरकारच्या या निर्णयानंतर,शहरातले निर्बंध शिथील करण्यात यावेत यासाठी दुकानदार-व्यावसायिक आक्रमक झाले. त्यांनी, निर्बंधांच्या विरोधात रात्री आठपर्यंत दुकानं सुरू ठेवून निषेध व्यक्त केला. तसेच, पुणे महापौरांनीं या संदर्भात पालकमंत्र्यांकडे पाठपुरावा करून, मागणी करूनही दुर्लक्ष केले जात आहे, असे सांगितल्यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी, “निर्बंधांतून शिथिलता हवी असेल, तर महापालिकेकडून राज्य सरकारकडे तसा प्रस्ताव पाठवावा”, असं सांगितलं.
राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे मुंबईच्या बॉम्बे रुग्णालयात दाखल, आठवड्याभरापासून आहेत उपचार सुरु
या सगळ्या घटनाक्रमांनंतर आता आज उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी, शहरातील कोरोना आढावा बैठकीत पुणे शहरातील निर्बंध शिथिल करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. जिल्हाधिकारी, महापौर, पालिका आयुक्त आणि लोकप्रतिनिधींसोबत त्यांनी ही आढावा बैठक घेतली. पुण्यात सर्व दुकाने सर्व दिवशी सुरु राहतील, हॉटेल आणि रेस्टॉरंट आठवड्यातील सर्व दिवस रात्री दहा पर्यंत सुरु राहतील, अशी महत्त्वाची माहिती त्यांनी आढावा बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना दिली.
मागणी मान्य, उद्यापासून पुणे अनलॉक !
– सर्व दुकाने सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरु राहणार
– हॉटेल रात्री १० पर्यंत सुरु ठेवता येणार
– शनिवार-रविवार सर्व सेवांना दुपारी ४ पर्यंत परवानगी
– मॉल रात्री ८ पर्यंत सुरु ठेवता येणार, लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना प्रवेश— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) August 8, 2021
- पुण्यातील सर्व दुकानं एक दिवस वगळता सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी
- हॉटेल आणि रेस्टॉरंट रात्री १० वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
- कोरोना लशीचे दोन डोस घेतलेल्यांना मॉलमध्ये प्रवेश देण्यात येणार.
- पुण्यात सोमवारपासून मॉल सुरु. लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच मॉलमध्ये प्रवेश. मॉल रात्री ८ पर्यंत सुरु राहणार.
- मॉल, हॉटेल आणि जलतरण तलाव यासाठी नवी नियमावली लागू केली जाणार.
- पुणे ग्रामीण लेवल 3 वर असल्याने ग्रामीण भागात ४ वाजेपर्यंतच परवानगी.
- निर्बंध शिथिल करण्यात येत असले तरी पॉझिटिव्हिटी रेट ७ % झाल्यास पुन्हा कडक निर्बध लावण्यात येणार.
- हॉटेल चालक आणि दुकानदारांना लशीचे दोन्ही डोस घेणं बंधनकारक
- पुण्यातील सर्व उद्यानं नियमित वेळेनुसार सुरु राहणार
- जलतरण तलाव वगळता इतर आऊटडोअर खेळांना परवानगी
- पुणेकरांना मास्क वापरणं बंधनकारक
मात्र पुणे ग्रामीणमधील १३ जिल्ह्याच्या निर्बंधात शिथिलता देण्यात आली नाही. या तालुक्यांना लेव्हल ४ ऐवजी लेव्हल ३ ची नियमावली लागू करण्यात आली आहे.को रोना रुग्णांची संख्या कमी झाल्यावर पुढील आठवड्यात पुणे ग्रामीणबाबत निर्णय घेतला जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.
Read Also :
- प्रदेशाध्यक्ष बदलीवरून चंद्रकांत पाटील म्हणतात, “भाजप प्रदेशाध्यक्ष बदलणार पण…”
- लवकरच येईन! महिनाभरापासून राज्य सरकारचे वाभाडे काढले नाहीत, राणेंचा महाविकास आघाडीला इशारा
- भाजपत अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणाने गाठले टोक, शहर भाजपची टीम दिल्ली दरबारी दाखल
- “पुण्याचा विकास फडणवीसांच्या सवडीनुसार नाही तर अजित पवारांच्या गतीने होणार”, चाकणकरांचा टोला
- कॉलेजनंतर आता हॉटेलवर ईडीची छापेमारी, समन्स बजावूनही गैरहजर राहत असल्याने कारवाई केली जात असल्याची चर्चा