दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार असल्याच्या बातम्या राजकीय वर्तुळात फिरत होत्या. मात्र, आता पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी, हा विस्ताराचा कार्यक्रम सुरु असून, या फेरबदलात काही विद्यमान मंत्र्यांना डच्चू मिळाला आहे. काहींच्या खात्यात फेरबदल होणार आहेत. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेतला गेला आहे, तर एकूण ४३ नव्या आणि अनुभवी चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. यामुळे आता, केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या ५३ वरून ८१ झाली आहे. यात राज्यातून ४ जणांची वर्णी केंद्रीय मंत्रिमंडळात लागली आहे.
ठाणे जिल्ह्याला पहिल्यांदाच थेट केंद्रीय मंत्रीमंडळामध्ये स्थान, कोण आहेत कपिल पाटील?
दरम्यान, आज या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराआधी, राज्यातले दिल्लीत असलेले केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे, तसेच केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे सुपूर्त केल्याची बातमी सगळीकडे प्रसारित करण्यात आली होती. मात्र, अखेर ही यादी समोर आली असून, यात रावसाहेब दानवे यांचा समावेश नसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. रावसाहेब दानवे यांनीही यावर खुलासा केला आहे. “पक्षाकडून राजीनाम्याबद्दल कोणाचाही फोन आलेला नाही. तसेच, मला राजीनामा देण्यासही कुणी सांगितलेले नाही,” असं दानवे यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यातून रावसाहेब दानवे, संजय धोत्रे आणि रामदास आठवले हे ३ राज्यमंत्री होते परंतु, यातील फक्त धोत्रे यांची गच्छंती झाली आहे.
नगरसेवक ते मोदी सरकारमध्ये केंद्रीय मंत्री; असा आहे औरंगाबादच्या भागवत कराड यांचा प्रवास
Other ministers who have tendered their resignation include DV Sadananda Gowda, Thaawarchand Gehlot, Santosh Kumar Gangwar, Babul Supriyo, Dhotre Sanjay Shamrao, Rattan Lal Kataria, Pratap Chandra Sarangi, and Debasree Chaudhuri.
— ANI (@ANI) July 7, 2021
महाराष्ट्रातून ४ नेत्यांचा नव्या विस्तारात समावेश.
महाराष्ट्रातून खासदार नारायण राणे,त्यांच्यासोबतच भिवंडीचे खासदार कपिल पाटील, भागवत कराड आणि भारती पवार यांनाही केंद्रीय राज्यमंत्रीपदाची संधी मिळणार आहे. हे खासदार सध्या दिल्लीत आहेत.
मोठी बातमी! पवारांची लागणार केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी
या 12 जणांचे राजीनामे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वीकारला आहेत
- सदानंद गौडा
- रवि शंकर प्रसाद
- थावर चंद गेहलोत
- रमेश पोखरियाल निशंक
- हर्ष वर्धन
- प्रकाश जावडेकर
- संतोष गंगवार
- बाबूल सुप्रियो
- संजय धोत्रे
- रत्तन लाल कटारिया
- प्रताप चंद्र सारंगी
- सुश्री देबश्री चौधरी
Read Also :
- राज्यातून ४ नेते मंत्रीपदी, एकूण ४३ मंत्र्यांची अधिकृत यादी जाहीर, वाचा एका क्लिकवर
- “अखेर काँग्रेसला हात दाखववून कृपाशंकर सिंग यांचा भाजपत प्रवेश, समीकरणे बदलणार
- “खासदार प्रीतम मुंडे दिल्लीत दाखल झाल्याची बातमी चुकीची आणि खोटी, त्या मुंबईतच”
- वडीलांची केंद्रीय मंत्रीमंडळात वर्णी; दोन्ही राणे बंधु दिल्लीत दाखल
- केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता, महाराष्ट्रातून ‘या’ दोन नेत्याची लागणार मंत्रीपदी वर्णी?