बीड : संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत वाल्मिक कराड याच्यावर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाला. त्यानंतर आज बीड कोर्टात व्हीसीद्वारे वाल्मिक कराडला हजर करण्यात आले. यात सुनावणी झाली असून कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. काही दिवसापुर्वी खंडणी गुन्ह्यांच्या अंतर्गत पोलिस कोठडी देण्यात आली होती. त्यानंतर आज कोर्चात हजर केले असता त्याच्या कोठडीत पुन्हा वाढ करण्यात आली.
हेही वाचा…४ हजार रोजगार, ५,२०० कोटी रूपयांची गुंतवणूक, दावोसमध्ये झाला पहिला सामंजस्य करार
पवनचक्की खंडणी प्रकरणातील गुन्ह्यानंतर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातही सहभाग आढळ्याने कराडवर हत्येसह मकोकाचा गुन्हा दाखल झाला. सुरूवातीला कराडला सात दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली होती. त्यानंतर आज पुन्हा कोर्टात हजर करत प्राथमिक तपास पूर्ण झाला असल्याने पोलिस यंत्रणेकडून कराडच्या कोठडीत मागणी न करण्यात आल्याने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
हेही वाचा…बीड प्रकरणातील सर्वात मोठा पुरावा, कराडसह घुले, चाटे CCTV च्या फुटेजमध्ये कैद
दरम्यान, सीआयडीने कराड, चाटे, घुले यांच्यासह इतर आरोपींचे कॉल डिटेल्स काढले आहेत. यात संतोष देशमुख यांच्या हत्येच्या दिवशी कराड आणि चाटे यांच्यात कॉल झाले आहेत. तसेच चाटे आणि घुले यांच्यातही संवाद झाला. हाच धागा पकडून कराडला मकोकामध्ये घेतल्याची माहिती आहे.
हेही वाचा…दावोसमध्ये महाराष्ट्राची विक्रमी गुंतवणूक..! इतक्या कोटींची झाली गुंतवणूक
हेही वाचा…ठाकरे गटाचे ४ आमदार अन् ३ खासदार फुटणार, बड्या नेत्याचा बडा दावा
हेही वाचा…उत्साहपूर्ण वातावरणात अजिंठा – वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप संपन्न
हेही वाचा…उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सावंतवाडी महाअधिवेशनाचे निमंत्रण
हेही वाचा…मोठी बातमी…! पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहित एकनाथ शिंदेंनी घेतला मोठा निर्णय