पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुक अवघ्या काही महिन्यांवर येवून ठेपली आहे. सध्या शहरात गणशोत्सवाचे वातावरण आहे. सत्ताधारी भाजपातील अनेकजणांनी पक्षांतराची तयारी पूर्ण केली आहे. भाजपाच्या भ्रष्ट आणि नात्यागोत्याच्या राजकारणाला अनेकजण वैतागले असून गणेश विसर्जनानंतर राष्ट्रवादीमध्ये इनकमिंग होण्यास सुरुवात होणार आहे. अनेकांनी अजितदादांशी संपर्क केला असून काहीजण स्थानिक नेत्यांच्या संपर्कात आहेत. येत्या काही दिवसांत राष्ट्रवादीमध्ये येणाऱ्यांची संख्या मोठी असेल, असा दावा पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांनी केला. त्यामुळे, पिंपरी चिंचवडच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता दिसून येत आहे.
मुख्यमंत्र्याची अनुसूचित जाती आयोगाला ग्वाही, ‘पीडितेच्या मुलांना वाऱ्यावर सोडणार नाही!’
पिंपरी चिंचवडसह राज्यातील महापालिका निवडणुकीला सहा महिने असताना राष्ट्रवादीच्या आमदाराच्या दाव्याने आधीपासूनच सुरू असलेल्या पक्षांतराच्या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे. एका ऑनलाईन माध्यमाशी बोलताना बनसोडेंनी गोप्यस्फोट केला आहे. बनसोडे म्हणाले, पिंपरी-चिंचवड पालिकेवर राष्ट्रवादीची पंधरा वर्षे सत्ता होती. या सत्तेचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहराच्या विकासासाठी वापर केला. नागरिकांच्या स्वप्नातील शहर प्रत्यक्षात उतरविण्याचा प्रयत्न केला. मात्र गतवेळीच्या निवडणुकीत 22 लाखांच्या मूर्ती घोटाळ्याचा खोटा आरोप भाजपच्या नेत्यांनी करून राष्ट्रवादीला बदनाम केले. नागरिकांनीही त्यांना कौल दिला.
प्रविण दरेकरांनी महिलांची माफी मागावी अन्यथा थोबड आणि गाल रंगवू – रुपाली चाकणकर
मात्र निवडणुकीत दिलेल्या एकाही आश्वासनाची पूर्तता भाजपला करता आली नाही. लाचखोरीमुळे शहराची बदनामी देशपातळीवर झाली. शाईफेक प्रकारामुळे त्यामध्ये भरच पडली आहे. गेल्या साडेचार वर्षांत भाजपाच्या सत्ताधाऱ्यांनी पालिकेतील सत्तेचा वापर केवळ आपल्या स्वार्थासाठी केला असून भ्रष्ट मार्गाने पालिकेची तिजोरी लूटली आहे. त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीत महापालिकेत सत्तांतर अटळ असून आम्ही केवळ आणि केवळ विकास हाच अजेंडा निवडणुकीमध्ये ठेवणार आहोत. सत्ता मिळाल्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून शहराच्या वेगवान विकासाचे शहरवासियांचे स्वप्न पूर्ण करू, असा विश्वासही बनसोडे यांनी यावेळी व्यक्त केला.
भ्रष्टाचारी “ब्रेन’ समोर येईल
स्थायी समितीचे अध्यक्ष लाचखोरी प्रकरणी पकडले गेले असले तरी ते एक प्यादे. भाजपात भ्रष्टाचार करयला लावणारी मंडळी वेगळी असून भ्रष्टाचार करायला लावणारे “ब्रेन’ शोधण्याची गरज असल्याचे मत अण्णा बनसोडे यांनी केले. यासाठी महापालिकेत गेल्या साडेचार वर्षांत विकासकामांच्या नावाखाली झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी केली असून ही चौकशी झाल्यास “भ्रष्टाचारी ब्रेन’ नक्कीच समोर येईल, असेही बनसोडे म्हणाले.
Read Also :
- शिवसेनेच्या “मुका” नंतर आता भाजपचा “मुका” वादाच्या भोवऱ्यात.!
- करुणा शर्मा यांची न्यायालयात सुनावणी, आज होणार फैसला सुटणार की अडकणार?
- मृत्यू दाखल्याची कॉपी पाठवा बस्स, नाहीतर संध्याकाळपर्यंत निलंबित करेन; सत्तारांनी ग्रामसेवकाला भरला दम
- प्रविण दरेकरांनी महिलांची माफी मागावी अन्यथा थोबड आणि गाल रंगवू – रुपाली चाकणकर
- पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची अखेर बदली; ‘त्या’ तक्रारीत तथ्य नाही!