मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. त्यांनतर, खासदार सुप्रिया सुळे यांनी शरद पवार राज्याच्या दौऱ्यावर निघणार असल्याची माहिती दिली. त्यामुळे, एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना, आता शरद पवारांचा दौरा निघणार असल्याने, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे, तर राष्ट्रवादीच्या गोटात नवचैतन्य निर्माण झाले आहे.
“मलाही तुमच्यातला दम पाहायचंय,” चित्रा वाघ यांनी स्वीकारलं मेहबूब शेख यांचं आव्हान
या पार्श्वभूमीवर आता अजून एक माहिती समोर येत असून, पवारांनी विधानसभेच्या पराभूत उमेदवारांची आता बैठक बोलावली आहे. 8 सप्टेंबरला मुंबईतील पक्ष कार्यालयात ही अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडणार असून, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडत असल्याने, या बैठकीत काय निर्णय घेतले जात आणि या नेत्यांवर काय जबाबदारी दिली जाते, याकडे लक्ष लागून आहे.
“…अन्यथा संजय राऊतांना पुण्यात फिरुही देणार नाही,” भाजपचा आक्रमक पवित्रा
दरम्यान, पुढच्या काही महिन्यांतच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत. ओबीसी आरक्षणा शिवाय या निवडणुका नको, असे सर्वच पक्षांचे मत असले तरीही दुसरीकडे सर्व पक्षांनी मोर्चेबांधणीला आणि पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. त्या अनुषंगाने राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांच्या या बैठीकीत काही महत्त्वाच्या सूचना पवारांकडून नेत्यांना सांगितल्या जातील. विविध विषयांवर चर्चा देखील होणे अपेक्षित आहे. तसेच, स्थानिक पातळीवरचे निर्णय तिथल्या स्थानिक नेत्यांवर पक्ष सोपविण्याची शक्यता आहे.
ब्रेकिंग! करुणा शर्मांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
दुसरीकडे, पवारांनी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात राष्ट्रवादीच्या सर्व महत्त्वाच्या मंत्र्यांची बैठक बोलावली होती. त्यात, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री छगन भुजबळ, मंत्री जितेंद्र आव्हाड, मंत्री राजेश टोपे, मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादीच्या सगळ्या १६ मंत्र्यांचा समावेश होता. यात त्यांच्या खात्यांर्गत विविध विषयांवर आणि त्यांच्य कामावर चर्चा झाल्याची माहिती आहे.
Read Also :
- भाजपला मोठा हादरा बसणार; मुंबईतील माजी आमदार शिवसेनेत घरवापसी करणार?
- महाराष्ट्र तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर; सण, उत्सव नंतरही साजरे करू शकतो; मुख्यमंत्र्यांच कळवळीच आवाहन
- “एक अनिल जेलच्या दरवाजात, तर दुसरा मुहूर्त शोधतोय,” किरीट सोमय्यांचा घणाघात
- “मंग बारामतीची एक जागा गेली म्हणून समजा आणि शरदला उमेदवारी द्या” शरद पवार यांच्या पहिल्या निवडणूकिचा किस्सा
- पडळकर खऱ्या बापाची औलाद असतील तर त्यांनी आरोप सिद्ध करावे, वडेट्टीवारांचे आव्हान