मुंबई : पुण्यातील भोसरी एमआयडी जमीन घोटाळा प्रकरणी, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची ईडीकडून चौकशी करण्यात येत असून, याच प्रकरणी एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना, अटक करण्यात आली होती. तब्ब्ल १३ तास कसून चौकशी केल्यानंतर ईडीने त्यांना बेड्या ठोकल्या होत्या आणि त्यांची रवानगी १२ जुलैपर्यंतईडीच्या कोठडीत करण्यात आली होती. यांनतर पुन्हा त्यांच्या कोठडीत वाढ करून १५ जुलैपर्यंत त्यांना कोठडी देण्यात आली होती.
का होतोय केंद्रावर नागरिकांची हेरगिरीचा केल्याचा आरोप? काय आहे नेमकं ‘पेगासेस’ प्रकरण; वाचा थोडक्यात
दरम्यान, या प्रकरणी ईडीने खडसेंच्या जावयाला मोठा धक्का दिला असून, या प्रकरणात आता गिरीश चौधरी यांच्या अटकेत २० जुलैपर्यंत वाढ करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता एकनाथ खडसे यांना देखील ईडीने मोठा दणका दिल्याचं बोललं जात आहे. एकनाथ खडसे यांच्या जावयाला ईडीकडुन ५ जुलै रोजी अटक करण्यात आली होती. दरम्यान, खडसेंच्या पत्नीला देखील ईडीने समन्स बजावलं होतं, मात्र त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती.
फडणवीसांचा खुलासा, भाजप हा नक्की ‘कुणाचा’ पक्ष? देशात मोदींच्या नेतृत्वाखाली ‘कुणाचे’ राज्य आहे?
फडणवीस सरकारमध्ये एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना, त्यांनी पुण्यातील भोसरी एमआयडीसीतील सर्व्हे नंबर ५२ मधील ३.१ एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप २०१६ मध्ये त्यांच्यावर झाला होता. ३१ कोटी रुपयांची किंमत असलेली ही जमीन खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीष चौधरी यांनी अब्बास उकानी या व्यक्तीकडून भूखंडाची निव्वळ ३.७ कोटी रुपयांना विकत घेतली होती, असा दावा केला गेला होता.
मुंबईला हे धोक्याचे इशारे तर नाही ना?, आशिष शेलार म्हणतात…
दरम्यान, या प्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने, झोटिंग समितीची स्थापना केली होती. या समितीच्या अहवालावरून खडसे यांना क्लीन चिट देण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, या अहवालाची मागणी केली असता, हा अहवाल मंत्रालयातून गहाळ झाला असल्याचे, मुख्य सचिवांनी शोधाअंती उपमुख्यमंत्र्यांना सांगितले आणि एकच गडबड-गोंधळ उडाला. कालांतराने हा अहवाल सापडला होता.
Read Also :
- उद्धव ठाकरेंबद्दल मला आदर; ‘त्या’ वादावर खासदार डॉ. अमोल कोल्हेंकडून पडदा टाकण्याचा प्रयत्न
- पांडुरंगाच्या महापूजेला येऊ नका, बंडातात्या कराडकरांची मुख्यमत्र्यांना हात जोडून विनंती
- “पंतप्रधान-गृहमंत्र्यांना दिलेली सुरक्षा अनावश्यक” म्हणणाऱ्या राऊतांची, चित्रा वाघ यांनी उडवली खिल्ली
- मनसेचे मिशन २०२२: राज ठाकरेंच्या पुणे दौऱ्यात पदाधिकाऱ्यांसोबत जोर बैठका
- पावसाळी अधिवेशन: ‘दलित, महिलांनी मंत्री झालेलं विरोधकांना बघवत नाही’