IMPIMP
Big statement of Bhujbal withdrawing from Nashik Lok Sabha elections due to humiliation Big statement of Bhujbal withdrawing from Nashik Lok Sabha elections due to humiliation

“अपमान झाल्यानं नाशिक लोकसभेच्या निवडणूकीतून माघार घेतली”, भुजबळांचं मोठं विधान

नाशिक :  लोकसभा निवडणुकीत आणि आता राज्यसभेच्या उमेदवारीवरून अजित पवार गटातील मंत्री छगन भुजबळ चांगलेच चर्चेत आले आहे. लोकसभेप्रमाणे आता राज्यसभेत देखील भुजबळांना डावलले असल्याची सध्या चर्चा सुरू झालीय. यातच आता नाशिकच्या जागेबाबत अपमान झाल्यानं माघार घेतली. अशी प्रतिक्रिया भुजबळांनी दिलीय. त्यामुळे याची सध्या एकच चर्चा सुरू झालीय.

हेही वाचा…अजित पवारांना सोबत घेऊन भाजपचे नुकसान झालं का ? बावनकुळेंनी दिलं ‘हे’ उत्तर 

यावेळी भुजबळ म्हणाले की, निवडणुक लढविण्यासाठी माझी इच्छा आहेच. यातच नाशिकची लोकसभा निवडणुक लढविण्याबाबत तयार झालो होतो. दिल्लीत माझं तिकीट देखील निश्चित केलं होतं. परंतु एक महिन्यांपासून उमेदवारांची घोषणा केली नव्हती. त्यावेळी मी थांबून घेतो असे सांगितलं. तसेच उमेदवारी देखील सरतेशेवटी घोषीत करण्यात आली. त्यामुळे याचे परिणाम म्हणून आपल्याला दिसले. तसेच निवडणुकीत जय पराजय हे होतच असतात.

हेही वाचा..राष्ट्रवादीने दावा ठोकल्यानंतर चिंचवडमध्ये अश्विनी जगताप ठाम, म्हणाल्या..

दरम्यान, लोकसभेला 48 पैकी आम्हाला फक्त 2 जागा मिळाल्या. आम्हाला मिळालेल्या 4 जागांपैकी एका जागेवर महादेव जानकर लढले. आमच्या एका जागेवर शिंदे गटातून आलेल्या आढळराव यांना तिकीट देण्यात आलं. आमच्या 2 जागांपैकी एक जागा आम्ही जिंकली, एकावर आम्ही पराभूत झालो. अशी कबुली देखील छगन भुजबळांनी दिलीय.

READ ALSO :

हेही वाचा..“RSSअन् भाजपकडून एवढे हाडतुड केले तरी मित्र मंडळ तिथचं”, शरद पवार गटाने डिवचलं 

हेही वाचा…“मुख्यमंत्री पदासाठी आमच्या पक्षात ‘जयंत पाटील’ सक्षम नेतृत्व”, रोहित पवारांचा मोठं विधान 

हेही वाचा…नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री पदाचा ‘मुरलीधर मोहोळांनी स्विकारला कार्यभार

हेही वाचा..नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री पदाचा ‘मुरलीधर मोहोळांनी स्विकारला कार्यभार

हेही वाचा…“बिल्डर पुत्राला पुन्हा रेड कार्पेट टाकून बाहेर काढण्यासाठी …”पुणे अपघातबाबत धंगेकरांचं मोठं संकेत