पुणे : विदर्भाच्या दौऱ्यावर असताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी अनेकदा, “शिवसेनेने पाठीत खंजीर खुपसला”, असं विधान केलं होतं. त्याला जोरदार उत्तर देताना, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी, “आम्ही समोरून कोथळा काढतो, पाठीत खंजीर खुपसत नाही. हे असलं घाणेरडं काम बाळासाहेबांनी आम्हाला कधीच शिकवलं नाही,” असा घणाघाती हल्ला केला. दरम्यान, त्यांच्या या विधानाचा भाजकडून जोडीदार निषेध केला जात असून, भाजपने “राऊतांना पुण्यात फिरुही देणार नाही,” असा इशारा दिला आहे.
“खंजीर खुपसणाऱ्या सेनेला धडा शिकवण्यासाठी हेच एक उत्तर!”, पाटलांनी सांगितला फॉर्म्युला
“संजय राऊत यांचं ते वक्तव्य ही एक धमकी असून, संस्कृतीला शोभणारे नाही. त्यामुळे, त्यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी आम्ही केली आहे. संजय राऊत यांनी माफी मागावी नाहीतर त्यांना पुण्यात फिरू देणार नाही, असा इशारा भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिला आहे. त्यानुसार डेक्कन पोलिस ठाण्यात शहर भाजपच्या वतीने तक्रार अर्जही देण्यात आला आहे.
“आम्ही खंजीर खुपसत नाही, थेट समोरून कोथळा काढतो” राऊतांचा घणाघाती हल्ला
तसेच, “संजय राऊत हे फक्त बोलबहाद्दर आहेत. ते वादग्रस्त वक्तव्य करूनच राजकारण करत असतात. प्रत्यक्षात मात्र ते फिल्डवर कधीही काम करत नाहीत. त्यांच्यात साधी निवडणूक लढवण्याची हिंमत नाही. कोथळा बाहेर काढू म्हणणं ही एक प्रकारे धमकीच आहे. ती आम्ही कधीही खपवून घेणार नाही. केंद्रीय मंत्री नारायण राणेंना त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर थेट अटक झाली होती. त्यामुळे आता राऊत यांना देखील तातडीने अटक, नाहीतर राज्यभरात आंदोलन केले जाईल,” असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
Read Also :
- ब्रेकिंग! करुणा शर्मांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
- बेळगाव महापालिकेत भाजपचा दणदणीत विजय; राज्यातील निवडणुकीत महाविकास आघाडीला फटका बसणार?
- करुणा शर्मा यांना अडकवण्यासाठी रचले गेले षडयंत्र? नवी माहिती समोर
- चित्रा वाघ-मेहबूब शेख यांच्यात रंगले सोशल मीडियावर जोरदार शाब्दिक युद्ध
- संजय राऊत तोंडघशी पडले, बेळगांव महानगरपालिकेवर भाजपची मुसंडी, स्पष्ट बहुमत