पुणे : अनेक महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर पुणेकरांसाठी एका खुषखबर आली आहे. कोथरुड मेट्रोची तांत्रिक चाचणी गुरुवारी रात्री घेण्यात आली आहे. पुण्यातील पहिल्या टप्प्यातील मेट्रो डेपो ते आनंदनगर या परिसरात मेट्रोची चाचणी झाली. तीन डब्यांची मेट्रो या रुळावरुन धावली. मात्र, यावरून आता पुण्यातील स्थानिक नेत्यांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. त्यामुळे, राष्ट्रवादी आणि भाजपा आमने- सामने आल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विशेष देखरेखीखाली पुणे मेट्रोचे काम चालू आहे. त्यामुळे ते लवकरच पूर्णत्वास जाईल आणि पुणेकरांना मोठा दिलासा मिळेल असे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशात जगताप यांनी सांगितले. मात्र भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्धाटन करण्याच्या मंत्रावर ठाम आहेत. दरम्यान, २०१९ मध्ये वनाज ते डेक्कन कॉर्नर दरम्यान मेट्रो सुरु होईल, अशी घोषणा निवडणुकीपूर्वी खासदार गिरीश बापट यांनी केली होती. त्यावरुन तेव्हा वादही झाला होता. मात्र, ही केवळ घोषणाच राहली. त्यानंतर २०२० मध्ये कोरोनामुळे लॉकडाऊन झाला आणि मेट्रोचे कामच ठप्प झाले होते. काही महिन्यांनंतर ते पुन्हा सुरु झाले.
महाराष्ट्रावरचं मोठं संकट टळलं, मात्र… राज्य सरकारचा मोठा निर्णय!
सध्या वनाज ते पौडफाटा दरम्यान लोहमार्ग व विद्युतीकरणाचे काम सुरु आहे. मात्र पौडफाटा येथील दुहेरी पुलाचे काम अजूनही बाकी आहे. तसेच या मार्गावरील एकही स्टेशन अजून बांधून पूर्ण झालेले नाही. त्यामुळे मेट्रोची तांत्रिक चाचणी करण्यात आली असली तरी प्रत्यक्ष मेट्रो धावण्यासाठी काही महिन्यांची वाट पहावी लागणार आहे, असे सध्या सुरु असलेल्या कामावरुन दिसून येत असतानाच उद्धाटनाच्या मुद्यावरून दोन्ही पक्षात चांगलीच खडाजंगी होण्याची चिन्ह दिसून येत आहेत..
राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवणार? अखेर शरद पवारांनी सोडलं मौन
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले की, सर्वच पालकांसाठी आपल्या बाळाने टाकलेलं पहिलं पाऊल हे अविस्मरणीय असतं. आज आपल्या लाडक्या मेट्रोने टाकलेलं पहिलं पाऊलही सर्व पुणेकरांसाठी अविस्मरणीय आहे. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या विशेष देखरेखीखाली चालू असलेलं मेट्रोच काम लवकरच पूर्णत्वास जाईल. ही मेट्रो भविष्यात भरधाव वेगाने धावणार आणि त्यासोबतच पुण्याच्या विकासालाही गती प्राप्त होणार आहे. त्या दिशेने टाकलेलं आजचं पहिलं पाऊल ऐतिहासिक आहे, असे जगतापांनी सांगितले.
शरद पवार ‘पंतप्रधान’ पदासाठी योग्य की ‘राष्ट्रपती’ पदासाठी? शिवसेनेने मांडली स्पष्ट भूमिका
मात्र, भाजपचे शहराध्यक्ष उद्घाटनासाठी श्रेयवादाची लढाई लढण्यातच मश्गुल असल्याचे चित्र आहे. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते व महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुणे मेट्रोचा भूमिपूजन सोहळा डिसेंबर २०१६ मध्ये संपन्न झाला होता. पुणेकरांचे मेट्रोचे स्वप्न लवकरच साकार होईल, असा शब्द या सोहळ्याच्या निमित्ताने पंतप्रधान व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजींनी दिला होता. मेट्रोच्या चाचणीचा हा व्हिडीओ म्हणजे पुण्याच्या सर्वांगीण विकासाचे दृश्य आहे. मेट्रोचे लवकरच उद्धाटन होईल आणि ते देवेंद्र फडणवीस आणि मोदींच्याच हस्ते होणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे, भाजपा शहराध्यांच्या श्रेयवादाच्या लढाईमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपात खडाजंगी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Read Also :
- ठाकरे सरकारने घेतलेले मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय, थोडक्यात.
- ‘‘स्वबळाची तयारी सुरु केली आहे कारण…” नाना पटोलेंनी केला मोठा खुलासा!
- “मुख्यमंत्र्यांनी शिक्षणाचा खेळ मांडून गुणवत्ता संपविण्याचा घाट घातला आहे”
- “पंकजा मुंडे समजूतदार, त्या कधीच बंडाचा विचार करणार नाहीत”- चंद्रकांत पाटील
- “तुम्ही आम्हाला जेवायला बोलवा, आम्ही स्वबळावर जेवायला येऊ”, मुख्यमंत्र्यांचे काँग्रेसला चिमटे