मुंबई : आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर भाजप-शिवसेना एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या असून, दोन्ही पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत.
“महाराष्ट्राच्या राजकारणात जातीयवाद राष्ट्रवादीच्या जन्मांनंतर वाढीस लागला,” राज ठाकरेंचे मोठे विधान
या पार्श्वभूमीवर आता भाजप आमदार वकील आशिष शेलार यांनी, “मुंबई महापालिकेतील एससी, एसटीच्या १३२ अधिकाऱ्यांच्या बदल्या का रखडवल्या आहेत? मंत्रालयातल्या बदल्यांप्रमाणेच आता महापालिकेतही वसुली केली जात आहे का?,” असा सवाल शिवसेनेला केला आहे.
शिवसेनेने महापालिकेत 132 मराठी अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा प्रस्ताव रोखून का धरलाय? मराठीच्या तथाकथित रखवालदारांनी मराठी अधिकाऱ्यांवर केलेला हा अन्याय आणि त्या मागे सुरु असलेला घोटाळा आम्ही मुंबईकरांसमोर उघडा करु! @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil @BJP4Mumbai @MPLodha pic.twitter.com/UNjxW8Ef5T
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) August 13, 2021
आशिष शेलार यांनी ट्विट करून हा सवाल उपस्थित केला असून, “मुंबई महापालिकेतील अनुसूचित जाती, जमातीसह इतर आरक्षणांच्या रिक्त जागांवर महापालिकेत सेवेत असलेल्या १३२ अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याचा प्रस्ताव स्थापत्य समितीत मंजूर झाला, परंतु ४ सर्वसाधारण सभानंतरही सत्ताधारी शिवसेनेने, या प्रस्तावाच्या मंजुरीला विलंब केल्याने, हा उशीर का करण्यात येतोय?, असाही सवाल त्यानी विचारला आहे.
मुंबई महापालिकेतील अनुसूचित जाती, जमातीसह आरक्षणांच्या रिक्त पदांवर महापालिकेत सेवेत असलेल्या 132 अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याचा प्रस्ताव स्थापत्य समितीत मंजूर झाला.
पण 4 सर्वसाधारण सभा घेऊनही सत्ताधारी शिवसेनेकडून या प्रस्तावाला मंजुरीसाठी विलंब का करण्यात येतोय?
1/2— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) August 13, 2021
चिटणीस पदावर शुभांगी “सावंत” यांना डावलून संगिता “शर्मा” यांना बढती देण्यात आली आहे. आता 132 मराठी अधिकाऱ्यांना पदोन्नती देताना पुन्हा अडवणूक करण्यात आली आहे. मंत्रालयातील बदल्यांप्रमाणे पालिकेत पण वसुली? मुंबईकर हो, हे पहा… अवतार मराठी माणसाच्या कैवाऱ्यांचे(?), मराठी अधिकाऱ्यांकडून वसुली करणाऱ्यांचे!, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
Read Also :
- रानडे इन्स्टिट्यूट बिल्डरच्या घशात घालण्याचा डाव हाणून पाडू; उदय सामंत यांचा इशारा
- शरीरसुखाची मागणी करणारे संजय राठोड आले मीडियासमोर; काय म्हणाले नेमकं? वाचा सविस्तर…
- औरंगजेब आणि चंद्रकांत खैरे या दोघांनी औरंगाबाद शहर खिळखिळ केलं; भाजप आमदाराचा घणाघात
- युती सरकारच्या काळात झालेल्या कथित चिक्की वाटप घोटाळा प्रकरणात आला नवा ट्विस्ट
- “संसदेत विरोधकांनी केलेल्या कृतीचे पवार समर्थन करतात का? त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावे’’