पुणे जिल्ह्यातील चाकण मधील थोपटवाडी येथील आरती कलवडे या सतरा वर्षे तरुणीची विविस्त्र करुन निघृण हत्या केल्याच्या घटनेनंतर आज घटनास्थळी विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर,मा.मंत्री बाळा भेगडे,आमदार महेश लांडगे, भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांच्यासमवेत भेट दिली.तसेच कलवडे यांच्या घरी जाऊन मा.दरेकर व बाळाभाऊ भेगडे यांनी कुटुबियांचे सांत्वन केले.
या तरुणीच्या प्रकरणातील गुन्हेगार हे प्रस्थिपत असून त्यांना राजकीय आश्रय असल्यामुळे आपल्या मुलीला न्याय मिळेल अशी आशा वाटत नसल्याची कैफियत कलवडे कुटुंबियांनी विरोधी पक्ष नेते दरेकर यांच्याकडे मांडली.
परंतु गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा विश्वास विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी कुटुंबियांना दिला. तसेच या प्रकरणात जलगदतीने तपास करुन दोषींवर कठोर कारवाई करण्याची आग्रही मागणी केली आहे. याप्रसंगी पुणे जिल्हा भाजप अध्यक्ष गणेश भेगडे, खेड तालुका अध्यक्ष अतुल देशमुख, जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील, तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे,पंचायत समिती सदस्य चांगदेव शिवेकर ,ज्योती जाधव आदी उपस्थित होते.
पनवेल,पुणे, सिंहगड कॉलेज,कोल्हापूर येथे झालेले बलात्कार व विनयभंगांच्या घटना तसेच नंदुरबार, इचलकरंजी, मालाड, देहू रोड या परिसरात महिला अत्याचार मोठ्या प्रमाणात झाले असून कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून पोलिसांचा गुन्हेगारांवर आता वचक राहिलेला दिसत नाही, म्हणून अशा प्रवृत्ती निर्माण होत आहेत.