पुणे : ॲमिनिटी स्पेस भाडेतत्त्वाने देण्याच्या विषयावरून महापालिकेतील सत्ताधारी भाजपने मंगळवारी एक पाऊल मागे घेतले. ‘‘शहरातील सर्व राजकीय पक्ष, स्वयंसेवी संस्था आणि पुणेकरांना विश्वासात घेऊनच हा विषय मंजूर करण्यात येईल,’’ अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपासून अॅमेनिटी स्पेस भाड्यानं देण्याचा मुद्दा गाजत होता. राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका गटानं भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. महापालिकेच्या सभेपूर्वी राष्ट्रवादीनं भूमिका बदलल्यानं भाजपला प्रस्ताव सादर करता आला नव्हता. त्यातच आता भाजपाने एक पाऊल मागे घेतल्याने पुण्यात भाजप बॅकफुटवर आली असल्याच्या चर्चांना उधान आले आहे.
शिवसेना नेत्याने पवारांबद्दल केलेले वक्तव्य सत्यपरिस्थितीवर आधारित – देवेंद्र फडणवीस
पुणे शहरातील महापालिकेच्या ताब्यातील अॅमेनिटी स्पेस भाडेतत्वावर देण्याबाबत अखेर सत्ताधारी भाजपची माघार घेतलीय. या निर्णयास विरोधी पक्षांसह सामाजिक संघटनांनी तीव्र विरोध केल्यानंतर आज होणाऱ्या मुख्यसभेत हा प्रस्ताव मंजुरीसाठी न आणण्याचा निर्णय भाजपने घेतलाय. याबाबत घाईघाईने कोणताही निर्णय न घेता पुणेकरांसह, सामाजिक संस्था, नागरिक सर्वांना एकत्र विश्वासात घेऊन आम्ही अॅमेनिटी स्पेस भाडेतत्वावर न देण्याचा निर्णय आम्ही घेणार असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केलं.
पुणे महानगरपालिकेतील पाशवी बहुमताच्या जोरावर मनमानी कारभार करणाऱ्या सत्ताधारी भाजपला अखेर पुणेकरांच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधासमोर झुकावे लागले असून, दीर्घ मुदतीच्या कराराने 185 ॲमेनिटी स्पेस भाड्याने देण्याचा निर्णय स्थगित करून पुढे ढकलावा लागला आहे. हा पुणेकरांचा विजय तर आहेच, शिवाय महानगरपालिकेची मालकी असलेल्या आणि सर्वसामान्य पुणेकरांच्या हक्काच्या जमिनी धनदांडग्यांच्या घशात घालण्याच्या भाजपच्या प्रयत्नाला लगावलेली जोरदार चपराक आहे. विघ्नहर्ता गजाननाने भाजपला उशिरा का होईना सद्बुद्धी दिली असून, त्यामुळे पुणेकरांवर भाजपमुळे येऊ घातलेले एक विघ्न टळले आहे, असा टोला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी लगावलाय.
दृष्टिक्षेपात ॲमिनिटी स्पेस…
महापालिकेच्या ताब्यातील जागा
८५६
प्रत्यक्ष वापर सुरूअसलेल्या जागा
५८६
शिल्लक
१८५
आरक्षित
८५
सर्वसाधारण सभेत प्रस्तावित केलेल्या जागा
२७०
२७० ॲमिनिटी स्पेसचे एकूण क्षेत्रफळ
१२३ एकर
Read Also :
- मुंबई पोलिसांनी २४ तासाच्या आता माझी माफी मागावी – किरीट सोमय्या
- सव्वा रुपयाऐवजी ही रक्कम वाढवायला हवी; चंद्रकात पाटलांनी उडवली संजय राऊतांची खिल्ली
- प्रवीण दरेकरांना रंगलेल्या गालाचा ‘मुका’ प्रकरण भोवलं; रुपाली चाकणकरांकडून एफआयआर दाखल
- राज्यसभा पोटनिवडणूकीसाठी भाजपकडून संजय उपाध्यायांचा अर्ज दाखल; कोणाचे पारडे जड ठरणार?
- वॉर्ड-प्रभागांची कितीही ढवळाढवळ करा, मुंबई महापालिकेवर भाजपचेच कमळ फुलणार – फडणवीस