गोवा – गोव्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. या ठिकाणी राजकीय घडामोडींना वेग आला असून फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुईजिन्हो फलेरो यांनी सप्टेंबर महिन्यात काँग्रेसला सोडचिट्ठी दिली .आता गोव्याचे आणखी एक माजी मुख्यमंत्री व आमदार रवी नाईक यांनी मंगळवारी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हा काँग्रेससाठी दुसरा मोठा धक्का मानला जात आहे. नाईक यांनी आज विधानसभा अध्यक्षांकडे आमदारकीचा राजीनामा सुपूर्द केला आहे.
संजय राऊतांची दिल्लीत खलबतं; शिवसेना UPA च्या निर्णायक वाटेवर?
नाईक हे पोंडा विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. गोवा भाजपचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नाईक यांचा भाजपमध्ये प्रवेश होऊ शकतो. नाईक हे दुसऱ्यांदा भाजपमध्ये प्रवेश करतील. याअगोदर ऑक्टोबर २००० मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी मनोहर पर्रीकर सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री होते. नाईक यांच्या दोन्ही मुलांनी अगोदरच भाजपमध्ये प्रवेश केला.
गोव्यात काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे. काँग्रेसने २०१७ च्या निवडणुकीत १७ जागांवर विजय मिळवला होता. आता हा आकडा दोनपर्यंत खाली आला आहे. गेल्या काही दिवसांपासून ते काँग्रेसमध्ये सक्रिय नव्हते. माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पक्षाच्या बैठकीलाही ते गैरहजर होते. नाईक हे १९९१ ते १९९३ दरम्यान आणि १९९४ मध्ये २ ते ४ एप्रिलदरम्यान राज्याचे मुख्यमंत्री होते.
बैलगाडा शर्यत लढा : न्यायालयातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर आमदार महेश लांडगेंचा दिल्ली दौरा
ते १९९८-९९ दरम्यान लोकसभेचे सदस्यही राहिले आहेत . गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुईजिन्हो फलेरो यांनी दोन महिन्यांपूर्वी काँग्रेस सोडत तृणमूलमध्ये प्रवेश केला. ते काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या जवळचे नेते होते. फलेरो यांच्यासारखा बडा नेता तृणमूल काँग्रेसच्या गळाला लागल्याने काँग्रेसमध्ये चिंतेचे वातवरण होते. आता पुन्हा पक्षाचा दुसरा बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे.
Read Also :
- ‘…तर त्यांचा माज उतरवू’; सुजय विखेंचा रोहित पवार, नीलेश लंकेंना टोमणा
- पक्षप्रवेश न केल्यामुळे भाजपाने मला तुरुंगात टाकले; काँग्रेस नेत्याचा दावा
- दिलीप वळसे पाटलांची बाजी, पुणे जिल्हा बँकेच्या संचालकपदी बिनविरोध
- पवार कुटुंब ओबीसी आरक्षणाचे कर्दनकाळ; गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल
- अकोले नगरपंचातीमध्ये भाजपचीच सत्ता; वैभव पिचड यांचा दावा