गोंदिया : एकीकडे राज्यातील कोरोनारुग्णांची संख्या कमी होत असतानाच आता म्युकरमायकोसिस या आजाराने डोकं वर काढले आहे. राज्यात या आजाराचे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत आहे. सरकारने या रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यंनी सरकारची ही घोषणा फसवी असल्याचा आरोप केला आहे.
देवेंद्र फडणवीसांनी म्हणाले की, ‘म्युकरमायकोसिस’ उपचारांचा खर्च प्रचंड आहे. राज्य सरकारची मोफत उपचारांची घोषणा फसवी आहे. राज्य सरकारने किमान या उपचारांसाठी लागणारे इंजेक्शन मोफत दिले पाहिजे. सरकारी किंवा खाजगी रूग्णालय असा भेद करू नये. खाजगी रूग्णालयातील उपचारांचे दर सुद्धा निश्चित व्हावे.
‘म्युकरमायकोसिस’ उपचारांचा खर्च प्रचंड आहे.
राज्य सरकारची मोफत उपचारांची घोषणा फसवी आहे. राज्य सरकारने किमान या उपचारांसाठी लागणारे इंजेक्शन मोफत दिले पाहिजे. सरकारी किंवा खाजगी रूग्णालय असा भेद करू नये.
खाजगी रूग्णालयातील उपचारांचे दर सुद्धा निश्चित व्हावे. माध्यमांशी संवाद… pic.twitter.com/KdIB9SJ4vh— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 26, 2021
राज्यात कुठेही म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येत नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडीची ही घोषणा फसवी आहे. असा आरोप फडणवीस यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज गोंदिया जिल्हा रुग्णालय येथे भेट दिली. यावेळी ते बोलत होते.
राज्य सरकारने किमान या उपचारांसाठी लागणारे इंजेक्शन मोफत दिले पाहिजे. मग सरकारी किंवा खासगी रुग्णालय असा भेद करू नये. रुग्ण खासगी रुग्णालयात असला तरी त्याला इंजेक्शन मोफत मिळाले पाहिजे. त्याचवेळी या आजारासाठी खासगी रुग्णालयातील उपचारांचे दरही निश्चित केले पाहिजेत, अशी मागणी फडणवीस यांनी केली.
Read Also :
- ‘भाजपाची पोलखोल करण्यात वेळ घालवण्यापेक्षा मराठा आरक्षण कसं मिळेल याचा सल्ला सरकारला द्या’
- ‘मालकाच्या कर्तृत्वाचे असे जाहीर पोतेरे करू नये’
- लक्षद्वीप प्रकरणी शरद पवारांचे पंतप्रधान मोदींना पत्र, म्हणाले…
- ‘गायब आमदार प्रताप सरनाईक यांचा शोध घ्या’
- PNB बँक घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चोक्सीला ‘या’ देशात अटक