पुणे : भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांच्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आणखी एक मोठी जबाबदारी सोपवली आहे. महाराष्ट्र भाजपच्या युवती विभागाच्या प्रभारीपदाची जबाबदारी चित्रा वाघ यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील यांनी पत्र लिहून चित्रा वाघ यांना देण्यात आलेल्या नव्या जबाबदारीविषयी कळवलं आहे.
कामचुकार, फसवे मंत्री विजय वडेट्टीवार यांची हकालपट्टी करा – चित्रा वाघ
चित्रा वाघ यांचा जवळपास २० वर्षाधिक कामाचा अनुभव आहे. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण, वन विभागाच्या अधिकारी दिपाली चव्हाण यांचे आत्महत्या प्रकरण अशा महिलांसंबधीच्या विविध मुद्द्यांवर त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपने यापुर्वी चित्रा वाघ यांच्यावर प्रदेश उपाध्यक्षपदाच्या सोपवल्या जबाबदार आपल्या नेतृत्वगुणाची चमक दाखवली. तत्कालिन वनमंत्री संजय राठोड यांचं नाव एका युवतीच्या मृत्य प्रकरणात आल्यानंतर राठोड यांचा राजीनामा घेण्यात चित्रा वाघ यांचा मोठा वाटा राहिला. भाजप नेतृत्व चित्रा वाघ यांच्या कामावर खूश आहे. त्याचमुळे त्यांच्या हाती आणखी एक जबाबदारी देण्यात आली आहे.
मा.दादा
पक्षाने व आपण दाखवलेल्या विश्वासाला मी नक्कीचं सार्थ ठरवेन
पुन:श्च मन:पुर्वक आभार 🙏 https://t.co/90DTZTvelV— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) June 30, 2021
क्या हुआ, तेरा वादा.. जयंतरावजी…; चित्रा वाघकडून जुन्या आठवणींना उजाळा
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश ने आज माझी भाजपा महाराष्ट्र – युवती विभागाच्या प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. पक्षाने दिलेली ही जबाबदारी मी उत्तमरीत्या पार पाडेन हा विश्वास देते, असं म्हणत चित्रा वाघ यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विधीमंडळ नेते देवेंद्र फडणवीस तसेच सुधीर मुनगंटीवार यांचे मनस्वी आभार मानले आहेत.
Read Also :
- कन्येने दिले उत्तर, “पात्रता पेक्षा जास्त मिळालं की असं होतं”; आता पडळकरांचे प्रत्युत्तर
- आंबील ओढा कारवाईशी माझा काय संबंध?; अजित पवार
- गोरगरिबांच्या घरांवर बुलडोझर फिरवताना, महापौर काय झोपा काढत होते का?
- अहमदनगर: महापौर पदी शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे तर उपमहापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे गणेश भोसले बिनविरोध
- नाहीतर तिसरी लाट येण्याआधी दुसरी लाट उलटेल, मुख्यमंत्र्यांनी दिला गंभीर इशारा