राज्यभरात लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कोसळलेल्या दूध दरात वाढ करण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटना आणि विरोधी पक्ष रस्त्यावर उतरले आहेत. दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वात हे दूध दर वाढीचं आंदोलन केलं जात आहे. यात अनेक शेतकरी संघटना आणि पक्षांनी सहभाग नोंदवला आहे. आंदोलनकर्त्यांनी दुधाला प्रतिलीटर 30 रुपये दर देण्याची मागणी केली आहे. यासाठी शेतकरी थेट रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळत आहे.
यावर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी आक्षेप घेत भात वर टीका केली आहे. “भाजपला दुधाचं आंदोलन करण्याचा अधिकार नाही, त्यांच्या काळात सलग 3 वर्षे दुधाचे दर कोसळले, सर्व शेतकरी 3 वर्षे आंदोलन करत होते, पण भाजपने त्याकडे दुर्लक्ष केले होते, शेवटी सरकार जाताना त्यांनी थोडी मदत केली, आमच्या सरकारने मागील 4 महिन्यांपासून दुधाच्या प्रश्नात लक्ष घातलंय” अशी टीका बाळा साहेब थोरात यांनी केली आहे.
दरम्यान, महायुतीने देखील आज दुध प्रश्नावर राज्यभरात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. महायुतीकडूनही जिल्हाधिकाऱ्यांना, तहसीलदारांना याबाबत निवेदन दिलं जाणार आहे. महायुतीने राज्यव्यापी दुध संकलन बंद करण्याचाही इशारा दिला आहे. राज्यव्यापी दुध संकलन बंद आंदोलन संदर्भात भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे नागपूरमध्ये निवेदन देणार आहेत.